पावसाने दिलासा; पेरण्यांना वेग!

By Admin | Updated: July 7, 2014 22:59 IST2014-07-07T22:59:24+5:302014-07-07T22:59:24+5:30

यवत व परिसरातील कासुर्डी, खोर, चौफुला आदी गावांमधे आज (दि.7) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली .

Rain relief; Sowing speed! | पावसाने दिलासा; पेरण्यांना वेग!

पावसाने दिलासा; पेरण्यांना वेग!

यवत : यवत व परिसरातील कासुर्डी, खोर, चौफुला आदी गावांमधे आज (दि.7) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली .
मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने चिंतित झालेल्या शेतकरी वर्गाला आजच्या पावसाने दिलासा मिळाला. तसेच, मागील दोन दिवसांपासून प्रचंड उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा आनंद  घेता आला. कालपयर्ंत कधी तरी ढगाळ वातावरण अन्यथा उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, आज अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसास सुरुवात झाली.
सुमारे पाऊण तास 
जोरदार एकसारखा पाऊस पडत होता. यामुळे परिसरातील रस्त्यावर पाणी साचले, तर नाल्यांमधूनही  
पाणी वाहिले. 
केवळ पाऊण तासाच्या काळात जोरदार झालेल्या पावसाने शेतातील स:या भरल्या होत्या. उसाचे पीक लांबलेल्या पावसाने अडचणीत आले होते, पण आजच्या पावसाने उसाला काही दिवस जीवदान मिळाले आहे . आता असाच पाऊस होऊ दे आणि दुष्काळ हटू दे, अशी प्रार्थना यवतकरांनी केली. (वार्ताहर)
 
4  सर्वच विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावल्याने शेतकरीवर्ग उसाचे पीक वाचविण्यासाठी प्रय}ाची पराकाष्टा करत होते. मात्र, परिसरातील सर्वच पाण्याचे स्नेत संपत चालले होते आणि धरण परिसरातही पाऊस नसल्याने मुळामुठा उजवा कालव्यातून पाणी सुटण्याची शक्यताही मावळली होती. त्यामुळे आजचा पाऊस यवत परिसरातील शेतीला जीवदान देणारा ठरला आहे.
 
सोमेश्वरनगर : आज दुपारी तीन वाजता सोमेश्वरनगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, या पावसावर पेरण्या होणार नाहीत. त्यासाठी अजूनही दमदार पावसाची आवश्यता आहे.  मृग नक्षत्र पूर्ण कोरडे गेल्याने जिरायती भागातील पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत. हा पडणारा अवकाळी पाऊस तात्पुरता आहे. बळीराजाला पेरण्यासाठी नक्षत्रंच्या पावसाची आवश्यता आहे. 
7 जुलै उजाडला, तरीही धरणो अजून कोरडीच आहेत. त्यामुळे दुष्काळाचे सावट अजून गडद होत चालले आहे. सध्या नीरा देवघरमध्ये 1.72 टक्के , भाटघरमध्ये 2.73 टक्के, तर वीरमध्ये शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.   
नीरा देवघर, भाटघर व वीर धरणातील पाणीसाठे संपले आहेत. गेल्या महिनाभरात धरण क्षेत्रत पाऊस पडलाच नाही. जून महिना संपत आला, तरीही धरण क्षेत्रत पावसाचा एक थेंबही न पडल्याने धरणातील साठे संपले आहेत. जुलै महिना चालू झाला, तरीही पाऊस काही पडेना. पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतक:यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पाऊस कधी पडणार व पेरण्या कधी होणार, याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरण्यांसाठी हा पाऊस पुरेसा नाही. अजून जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
ओढे, नाले, तळी, विहिरी, बोअरवेल, नदी यामधील पाणीसाठे आता संपले आहेत. जिरायती भागातील काही गावांत तर आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्र गंभीर बनत चालला आहे. हवामान बदलाचा परिणाम होऊन मॉन्सूनची गती मंदावल्याने शेतक:याला अजून काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे.  गेल्या वर्षी या दिवसात धरणक्षेत्रत चांगला पाऊस चालू होता. (वार्ताहर)
 
माळेगाव : येथे रविवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी साधारणत: दीड तास पडत होता. त्यामुळे काही प्रमाणात शेतात उभ्या असणा:या पिकांना जीवदान मिळाले आहे. साधरणत: 1.3क् तास पडत होता. या पावसाने शेतक:यांच्या शेतातील उभी पिकांना जीवदान मिळाले. तसेच कारखान्याचा लागणी हंगामासाठी ऊसाचे बेणो शेतात लावणोसाठी व मशागतीसाठी शेतक:यांची लगबग सुरू झाली आहे. 
 
कवठे येमाई : महिनाभरापासून संपूर्ण राज्यात दडी मारलेल्या पावसाने अचानकपणो हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. अचानक आलेल्या पावसाने खरीप पेरणीसाठी वाट पाहणारा शेतकरी आज काही अंशी सुखावला.
शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता. मलठण, कवठे येमाई, सविंदणो या भागाबरोबर कान्हूर मेसाई परिसरात दर वर्षी मूग पेरणी मोठय़ा प्रमाणात केली जाते. मात्र, या वर्षी मृग, आद्र्र नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतक:यांनी पेरणीपूर्व शेतीची केलेली मशागत तशीच पडून होती. कवठे येमाई मधील काही परिसरात शेतक:यांनी डिंभा उजवा कालव्याच्या पाण्याने शेत ओले करून बाजरीची पेरणी केली होती. आज झालेल्या पावसामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मात्र, आज अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पावसाने झोडपले. (वार्ताहर)
 
4शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात आज झालेल्या पावसामुळे फळबागांना जीवदान मिळाले आहे. मुगाच्या पेरण्या मात्र होण्याच्या आशा उरल्या नाहीत.  कवठे येमाई परिसरातील 237क् हेक्टरला या पावसाचा दिलासा मिळणार आहे. येथील  मुंजाळवाडी , इचकेवाडी ,सविंदने, कान्हूर, मिडगुलवाडी, चिंचोली मोराची, शास्ताबाद , मलठण   , लाखेवाडी या गावांतील पेरण्यांना वेग येणार आहे. 
 
निमगाव केतकी :   निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सोमवारी रिमङिाम पाऊस झाला. त्यामुळे शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाणी प्रश्न मार्गी लागण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून निमगाव केतकी परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. पावसाअभावी पानवेली, डाळींब बरोबरच मिर्ची, वांगी, टोमॅटो, केळी  पिके अडचणीत आली आहेत. या पिकांना आजच्या पावसाने दिलासा मिळाला आहे.
 

 

Web Title: Rain relief; Sowing speed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.