पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप

By Admin | Updated: July 14, 2014 04:42 IST2014-07-14T04:42:04+5:302014-07-14T04:42:04+5:30

आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांना आज दिवसभर पडणाऱ्या पावसाने उल्हसित केले. हंगामात पहिल्यांदाच दिवसभर सलग पावसाची रिपरिप सुरू होती

Rain rains throughout the day in Pune | पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप

पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप

पुणे : आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांना आज दिवसभर पडणाऱ्या पावसाने उल्हसित केले. हंगामात पहिल्यांदाच दिवसभर सलग पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी साडेपाचपर्यंत ५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
दिवसभर पाऊस पडत असला तरी त्यास जोर नव्हता. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. मात्र त्यामुळे रस्ते ओले झाले होते आणि त्यावरून पाणी वाहत होते. शहरासह उपनगरांमध्येही पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी शहराच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासून ढगाळ हवामान होते. सकाळी अकराच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळपर्यंत कायम होता. सायंकाळी ६ नंतर पावसाने थोडी उघडीप घेतली. लोहगाव येथेही ५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
पावसामुळे हवेतील गारवा वाढला आणि तापमानात मोठी घट झाली. गेल्या आठवड्यात ३३ अंशांपर्यंत असलेले तापमान आज घटून २७.६ अंशांपर्यंत खाली आले, यामुळे दिवसाही हवेत गारवा जाणवत होता. पुढील ४८ तासांत शहरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rain rains throughout the day in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.