पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप
By Admin | Updated: July 13, 2014 00:17 IST2014-07-13T00:17:39+5:302014-07-13T00:17:39+5:30
आतुरतेने वाट पाहणा:या पुणोकरांना आज दिवसभर पडणा:या पावसाने उल्हसित केले. हंगामात पहिल्यांदाच दिवसभर सलग पावसाची रिपरिप सुरू होती.

पुण्यात दिवसभर पावसाची रिपरिप
पुणो : आतुरतेने वाट पाहणा:या पुणोकरांना आज दिवसभर पडणा:या पावसाने उल्हसित केले. हंगामात पहिल्यांदाच दिवसभर सलग पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळी साडेपाचर्पयत 5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
दिवसभर पाऊस पडत असला तरी त्यास जोर नव्हता. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. मात्र त्यामुळे रस्ते ओले झाले होते आणि त्यावरून पाणी वाहत होते. शहरासह उपनगरांमध्येही पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी शहराच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासून ढगाळ हवामान होते. सकाळी अकराच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळर्पयत कायम होता. सायंकाळी 6 नंतर पावसाने थोडी उघडीप घेतली. लोहगाव येथेही 5 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
पावसामुळे हवेतील गारवा वाढला आणि तापमानात मोठी घट झाली. गेल्या आठवडय़ात 33 अंशांर्पयत असलेले तापमान आज घटून 27.6 अंशांर्पयत खाली आले, यामुळे दिवसाही हवेत गारवा जाणवत होता. पुढील 48 तासांत शहरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता पुणो वेधशाळेने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)