शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बरसा रे सावन जोर जोर से... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 19:42 IST

यावर्षी मान्सूनच्या पहिल्या पावसाचे झालेले आगमन वातावरणात रंग भरुन गेले.

ठळक मुद्देलोणावळा, जुन्नर, परिसरात पावसाची हजेरी,तारांबळ  

पुणे:  काही दिवसाच्या प्रचंड उकाड्याने प्रत्येकजण हैराण झाला होता. अशा परिस्थितीत शुक्रवारी दुपारी आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली. त्यानंतर उष्णतेची जागा वाऱ्याने घेतली. सरीवर सरींनी मुसळधार रुप धारण करत कोसळलेला वरुणराजा लहान मुलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रसन्नता, समाधान, आनंदाची मोहोर उमटवून गेला. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, लोणावळा, जुन्नर, आदी परिसरात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, गारांचा पाऊस देखील बरसला...  गेले काही दिवस मान्सूनच्या प्रवासाच्या बातम्यांनी तो कधी एकदा हजेरी लावतो असे झाले होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे वातावरणात निर्माण झालेला प्रचंड असहाय्य उकाडा.. मात्र, शुक्रवारी अखेर तो आला आणि त्याने निसर्गासह सर्वांचेच रुप पालटवले. या पावसाने सर्वांचीच थोडी धावपळपण केली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ देखील उडवली. सायंकाळी लोणावळा परिसरातील कार्ला, वाकसई, सदापुर, वरसोली आदी भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. 

...................  वीज पुरवठा वारंवार खंडित देहूरोड परिसरातील विकासनगर, किवळे, चिंचोली,गहूंजे आदी भागात शुक्रवारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तासभर पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात किवळे, विकासनगर, देहूरोड व चिंचोली येथे मुख्य रस्त्यांवर पाण्याची तळी साचली होती. वीज पुरवठा दिवसभर वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले होते .

...................कामशेतमध्ये अवकाळी पावसाची हजेरीगतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची दाहक सुरुवात झाल्यामुळे वृद्ध,महिला,नागरिक व आजारी लोकांना उन्हाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शुक्रवारी सकाळपासून कडक उन्हामुळे नागरिकांना घरात बसणेही शक्य नसताना सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक सुखावले.

.....................घोडेगाव, शिरुर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूघोडेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसात अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. तसेच अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या बातम्या येत होत्या. दरम्यान, भिमाशंकर व तळेघर परिसरातही तुरळक पाऊस झाला तर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसाची सगळेच जण वाट पाहात होते. जिल्हयात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पडलेल्या पावसाने वाढत चाललेल्या उकाड्याच्या दिवसात एख सुखद दिलासा दिला. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJunnarजुन्नरlonavalaलोणावळाRainपाऊस