भोर तालुक्यात पावसाचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:58+5:302021-07-23T04:08:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भोर : तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने पश्चिम भागातील महाड भोर रस्त्यावर सहा सात तर रिंगरोडवर ...

Rain haze in Bhor taluka | भोर तालुक्यात पावसाचे धुमशान

भोर तालुक्यात पावसाचे धुमशान

लोकमत न्यूज नेटवर्क

भोर : तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने पश्चिम भागातील महाड भोर रस्त्यावर सहा सात तर रिंगरोडवर तीन ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्या. यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. दोन ठिकाणी पुल वाहुने गेले. तर डोंगरातील दरडी पडुन भात खाचरे वाहुन गेली. अनेक ठिकाणी वीजेचे खांब पडल्याने अनेक गावातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

भोर तालुक्यात बुधवारी (दि. २०) रात्रभर सुमारे ३५० मिली मीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामूळे भोर महाड रस्त्यावरील हिर्डोशी गावाच्या हद्दीत तीन ठिकाणी, वारवंड गावाच्या हद्दीत दोन ठिकाणी, शिरगाव आणि वरंध घाटात अशा सात ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन पाच जेसीबीच्या मदतीने दरडी हटवण्याचे काम सुरु आहे. निरादेवघर धरणाच्या काठ रस्त्यावरील कंकवाडी गावाजवळ दरड पडली. रस्ता खचल्याने वाहातुक बंद आहे. तर पऱ्हर व कुडली या गावाजवळ दरड पडल्याने रस्त्यावरील वाहातुक पुर्णपणे बंद झाली आहे. रस्त्यावरील पडलेली झाडे झुडपे दरडी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. धानवली गावाला जाणारा रस्ता खचल्यामुळे येथील वाहातुक बंद झाली. लोकांचा संर्पक तुटलेला आहे.

दरम्यान काल झालेल्या अतिवृष्टीमुळे रायरेश्वर किल्याखाली आसलेल्या धानवली रायरी, कारी, कंकवाडी, गुढे निवंगण यासह

कारुंगण, वारवंड, शिळींब, अशिपी, साळुंगाणा, उंबार्डै शिरगावसह अनेक डोंगरा खालील व ओढे नदी, नाले वाहनांच्या काठांवरील गावात पावसाने दरडी पडुन पाणी खाचरात जाऊन लागवड केलेली भात खाचरे गाळाने भरली. ताली पडुन खाचरे गाडली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान उपविभागीय आधिकारी

राजेंद्रकुमार जाधव तहसिलदार आजित पाटील पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दरडी पडलेल्या भोर महाड रस्ता धानवली येथील नुकसानीची पाहाणी केली. तहसिलदार अजित

पाटील यानी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

आंबवडे रायरेश्वर किल्ला रस्त्यावरील आंबवडे गावाजवळचा दगडी पुल वाहुन गेल्याने आंबवडे खोऱ्यातील वाहातुक बंद आहे.

चौकट

वीजेच्या धक्याने एकाचा मृत्यू

पान्हवळ ते घोरपडेवाडी पुल वाहुन गेला आहे. दरड पडल्यामुळे साळुंगण येथील स्मशानभुमी दगड मातीत गाडली आहे. तर पोल्ट्रीतील पक्षी भरताना वीजेचा धक्का लागुन मोहन अमृता घोरपडे (रा. घोरपडेवाडी ता भोर) याचा मृत्यू झाला आहे. सांगवी भिडे येथील पुल पाण्याखाली गेला आहे. निरानदी च्या पाण्याची पाणी पातळी अचानक वाढल्याने भोर शहरा तील पदमावती वस्तीत पाणी शिरले होते.

चौकट

भोर तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती महाड रस्त्यावरील दरडी धानवली गाव व दोन वर्षापुर्वी भुस्कलन झालेल्या कोंढरी गावाला भेट देऊन उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी एका कुटुंबाचे स्थलांतर केले. पाऊस वाढल्यास संपूर्ण गावाचे स्थलांतर करुन सुरक्षित ठिकाणी हलवणार असल्याचे राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले.

चौकट

वीज वाहिनीतील बिघाडामुळे नाझरे कर्नावड चिखलागाव टिटेघर, महाकोशी वडतुंबी, कोर्ले, ओहळी रायरेश्वर किल्ला ही गावे अंधारात आहेत. उच्चदाब वाहिनीचे पोल पडल्यामुळे कुंड अशिपी तर लघुदाब वाहिनीचे पोल पडल्याने पांगारी, भोर निवंगण दुर्गाडी, शिळींब, कुंड राजिवडी, उंबार्डे, माझेरी येथील वीजपुरवठा खंडीत झाला असुन दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी सांगितले.

भोर महाड रस्त्यावरील हिर्डोशी वारवंड शिरगाव व वरंध घाट आणी रिंगरोडवरील कंकवाडी पऱ्हर, कुडली येथे दरडी काढण्याचे काम पाच जेसीबीच्या मदतीने काल रात्री २.३० वाजल्यापासुन सुरु आहे. रात्रीपर्यत काम पुर्ण होऊन वाहातुक सुरु होईल. अतिवृष्टीमुळे दरडी पडत असल्यामुळे पुढील दोन दिवस रस्ता वाहातुकीस बंद करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपआभियंता संजय वागज व शाखा अभियंता सदानंद हल्लाळे यांनी सांगितले.

चौकट

अतिवृष्टीमुळे घाटात दरडी पडत असल्याने भोर पोलीसांनी भोर महाड रस्त्यावरील महागिर ओढ्या जवळ बॅरिगेट लावुन पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या जाणाऱ्याची चौकशी करुन सोडले जात आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीने महाडकडे जाणारी वाहातुक बंद केली असल्याचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी सांगितले.

फोटो :

भोर महाड रस्त्यावर दरड पडल्याने वाहातुक बंद वाहनाच्या रांगा भात शेती खराब वीजेचे पोल पडले फोटो

Web Title: Rain haze in Bhor taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.