शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा धुडगूस; रावडे गावात गोठा कोसळला, ३ गुरे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:43 IST

रावडे गावातील हुलावळेवाडी येथे जोरदार पावसाने सायंकाळी गुरांचा गोठा कोसळला. गोठ्यातील वासे, पत्रे व कौले अंगावर पडल्याने गोठ्यातील असलेल्या तीन गुरांना गंभीर दुखापत झाली.

ठळक मुद्देगेल्या तीन चार दिवसांपासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुडगूस घातला आहे.गोठ्यातील वासे, पत्रे व कौले अंगावर पडल्याने गोठ्यातील असलेल्या तीन गुरांना गंभीर दुखापतगोठा कोसळल्याने हुलावळे यांच्यासमोर गुरांना ठेवण्याचा प्रश्न

भूगाव : गेल्या तीन चार दिवसांपासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुडगूस घातला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, जोरदार वादळवारा यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी झाडे कोसळण्याबरोबरच घराचे पत्रे व कौले फुटण्याच्या घटना झाल्या आहेत. मुळशी तालुक्यातील रावडे गावातील हुलावळेवाडी येथे जोरदार पावसाने सायंकाळी गुरांचा गोठा कोसळला. गोठ्यातील वासे, पत्रे व कौले अंगावर पडल्याने गोठ्यातील असलेल्या तीन गुरांना गंभीर दुखापत झाली. रावडे (हुलावळेवाडी) येथील मधूकर हुलावळे यांचा घरामागेच गुरांचा गोठा आहे. जोरदार पाऊस असल्याने सर्वजण घरामध्येच बसले होते. गोठ्याजवळच थांबलेल्या गावातील ओंकार हुलावळे, ऋषिकेश हुलावळे, वैभव हुलावळे, कुनाल हुलावळे या तरुणांना गोठा पडत असल्याचे जाणवले. गोठ्यात तीन म्हशीच्या बांधलेल्या होत्या. गावातीलच विठ्ठल हुलावळे, नवनाथ हुलावळे, किरण हुलावळे यांनी जीवाची पर्वा न करता गोठ्यात जाऊन जनावरे सोडली. परंतु जनावरे सोडताक्षणी गोठा अंगावर कोसळला. ते ढिगार्‍यात अडकून पडले होते. त्यांच्या व जनावारांच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी मदतीकरीता धावून आले. त्यांनी पत्रा फोडुन या तरुणांसह गोठ्यातील तीन गुरांना बाहेर काढले. सुदैवाने तरुणांना यात काहीच जखम झाली नाही, परंतु गोठ्यातील वासे, पत्रे व कौले अंगावर पडल्याने गोठ्यातील असलेल्या तीन गुरांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच गोठा कोसळल्याने हुलावळे यांच्यासमोर गुरांना ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे