मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पाऊस
By Admin | Updated: November 11, 2014 01:29 IST2014-11-11T01:29:33+5:302014-11-11T01:29:33+5:30
गेल्या 2-3 दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात घट होण्यास सुरूवात होत असतानाच त्यात अवकाळी पावसाने विघA घातले आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पाऊस
पुणो : गेल्या 2-3 दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानात घट होण्यास सुरूवात होत असतानाच त्यात अवकाळी पावसाने विघA घातले आहे. सोमवारी दिवसभरात मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
ढगाळ हवामानामुळे सोमवारी राज्याच्या किमान तापमानात पुन्हा वाढ झाल्याने थंडीचे आगमन लांबणार आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाचर्पयत सोलापूरमध्ये 7 मिमी, उस्मानाबादमध्ये 3 मिमी आणि परभणीमध्ये क्.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात प्रामुख्याने ढगाळ हवामान असल्यामुळे तेथील कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ झाली. त्यामुळे कालर्पयत सरासरीच्या खाली असलेल्या बहुतांश शहरांचे रात्रीचे तापमान सरासरीच्या वर पोहोचले. त्यामुळे रात्री हवेत जाणवणारा गारवा गायब झाला आहे.
बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून त्याचे द्रोणीय पट्टय़ात रूपांतर झाले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे हा पट्टा ओढून घेत असल्याने राज्यात थंडी पडत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तर भारतातही अजूनही थंडीचा कडाका वाढलेला नाही. पुढील 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज पुणो वेधशाळेने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)