शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-पंढरपूर मार्गावरील रेल्वे गेट ३६ तास राहणार बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:25 IST

ऐन गणपती सणानिमित्त गावी जाणाऱ्यांना ४० किलोमीटरचा वळसा...

नीरा (पुणे) : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे-मिरज लोहमार्गावर, वाल्हे- नीरा दरम्यानचे, थोपटेवाडी (ता.पुरंदर) हद्दीतील रेल्वे गेट शनिवार - रविवारी ३६ तास बंद राहणार असल्याचे रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

पुणे मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ रेल्वेफाटक शनिवार (दि. १६) सकाळी ७ ते रविवार (दि.१७) सायंकाळी ७ पर्यंत ३६ तास वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रका द्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी, पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यातील पुणे - पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट रेल्वे रूळच्या दुरूस्तीसाठी (रेल आणि स्लीपर बदलण्यासाठी) व निरीक्षणासाठी रेल्वे फाटक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती, रेल्वेच्या वतीने , प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

दरम्यान, सोमवारी वाल्हे व नीरा ग्रामपंचायत कार्यालयास यासंदर्भातील पत्र, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र, ऐन गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने मुंबई पुण्याहून गावी जाणाऱ्या प्रवाशांना या पालखी महामार्गावरील रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याने, आता जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा नीरा येथे येऊन पुढिल प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल ४० किलोमीटरचा वळसा सर्व प्रवाशांना पडणार आहे. 

ऐन गणपती सणांच्या दोन दिवस आगोदर विकएंड काळात रेल्वेगेट बंद ठेवण्यात येणार असल्याने, रेल्वे प्रशासनावर प्रवाशी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत असून, या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी नीरा- मोरगाव- जेजुरी या लांबच्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे