शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला चार वर्षात १२ कोटींची ‘प्लॅटफॉर्म’ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 23:00 IST

पुणे विभाग: दररोज सुमारे साडे आठ हजार जणांची फलाट वारी

ठळक मुद्दे विविध स्थानकांवर चार वर्षात ९६ लाखांहून अधिक प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री अन्यथा विनातिकीट प्रवासी समजून संबंधितांकडून आकारला जातो दंड

पुणे : रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना निरोप देण्यासाठी किंवा घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर येणारे त्यांचे नातेवाईक, मित्रांनी रेल्वेला मागील चार वर्षात १२ कोटी रुपयांची कमाई करून दिली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध स्थानकांवर चार वर्षात ९६ लाखांहून अधिक प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री झाली. त्याद्वारे सुमारे १ कोटी १३ लाख जणांनी फलाटावर ‘एंट्री’ मिळविली. त्यापैकी ८० टक्के प्रवासी एकट्या पुणे रेल्वे स्थानकावरील आहेत. रेल्वे स्थानकावरील फलाटांवर प्रवेश करायचा असल्यास एकतर प्रवासाचे तिकीट किंवा फलाट तिकीट असणे आवश्यक आहे. अन्यथा विनातिकीट प्रवासी समजून संबंधितांकडून दंड आकारला जातो. बाहेरगावी जाणारे किंवा बाहेगावाहून येणारे आपले नातेवाईक, मित्रांना भेटण्यासाठी स्थानकांवर मोठी गर्दी होते. एका प्रवाशासोबत किमान एक-दोन नातेवाईक असतातच. काही पाच-सहा जणांचे कुटूंब किंवा मित्रांचा ग्रुप येतो. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांव्यतिरिक्त त्यांचीही झुंबड उडालेली असते. त्यांच्यासह रेल्वे स्थानकांवर येऊन आश्रय घेणाºयांना आवर घालण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट घेणे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे फलाटावर प्रवेश करण्याआधी प्रवासी तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीट घेणे आवश्यक आहे. यापैकी कोणतेही तिकीट नसल्यास किमान २५० रुपयांचा दंड भरावा लागतो. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर, मिरज जंक्शन, कोल्हापूर सह विविध रेल्वे स्थानकांवर यावर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत १३ लाख ३८ हजार प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री झाली. एका व्यक्तीसाठी १० रुपये तिकीट दर असून एका तिकीटावर प्रत्येकी १० रुपये याप्रमाणे २-३ जणांना प्रवेश करता येऊ शकतो. त्यानुसार या कालावधीत सुमारे १५ लाख ६० हजार जणांनी फलाट वारी केली. त्यातून रेल्वेला सुमारे १ कोटी ५६ लाखांचा महसुल मिळाला. मागील तीन वर्षातही फलाट वारी करणाºयांची संख्या जवळपास तेवढीच आहे. आॅक्टोबर २०१९ पर्यंतच्या चार वर्षात एकुण १ कोटी १३ लाख जणांनी फलाट तिकीट घेतले. त्यामाध्यमातून रेल्वेने सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केली.

..............

पुण्यात सात हजारांची वारीपुणे विभागामध्ये सर्वाधिक वर्दळ पुणे रेल्वे स्थानकात असते. त्यानुसार फलाट विक्रीही याच स्थानकावर सर्वाधिक होते. विभागात होणाºया एकुण फलाट तिकीट विक्रीपैकी ८० टक्के विक्री पुणे रेल्वे स्थानकावर होते. त्यापाठोपाठ मिरज जंक्शन, कोल्हापुर या स्थानकांचा समावेश होतो. पुणे स्थानकात दररोज सरासरी साडे आठ हजार जण येतात. दरम्यान, काही महिन्यांपासून फलाट तिकीटांच्या विक्रीचे काम भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळा (आयआरएसडीसी )कडे दिले आहे.--------------फलाट तिकीटातून मिळालेले उत्पन्नवर्ष                     तिकीट विक्री                   प्रवासी                      उत्पन्न२०१६-१७            २७,४९,५२३                  ३२,२०,४६१               ३,२२,०४,६१०२०१७-१८             २८,३२,१८९                 ३२,९६,९०४               ३,२९,६९,०४०२०१८-१९             २७,५२,९६७                 ३२,१५,९२९              ३,७७,६१,४६०२०१९-२०           १३,३७,७३८                  १५,५९,७४५                १,५५,९७,४५०------------------------------------------------------एकुण                ९६,७२,४१७                 १,१२,९३,०३९             ११,८५,३२,५६०-----------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे