शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Pune Hoarding Collapse: रेल्वे प्रशासनानं मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 22:56 IST

लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत.

पुणे-  लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, आठ ते नऊ जण जखमी झाले आहेत. त्या प्रकरणी आता रेल्वे प्रशासनानं प्रतिक्रिया दिली आहे. जुना बाजार चौकात होर्डिंग पडण्याची घटना दुर्दैवी असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. हे होर्डिंग एका ऍड एजन्सीला दिले होते. या होर्डिंगचा ढाचा मजबूत नव्हता. त्यामुळे मध्य रेल्वेने सदर एजन्सीला वारंवार सांगूनही होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आले नाही. अखेर रेल्वे प्रशासनाने हे काम त्यांच्याकडून काढून दुसऱ्या एजन्सीला दिले. होर्डिंग हटवण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते.

मध्य रेल्वेमार्फत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले जाणार असून, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे.  किरकोळ जखमी व्यक्तींना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकानजीक असलेले हे लोखंडी होर्डिंग तुटून रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांवर पडले.यात सात ते आठ वाहनांचे नुकसान झाले. तसेच अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात देहूरोडमधील शामराव धोत्रे(48), पिंपळे गुरवमधील भीमराव कासार(70), नानापेठेतील शिवाजी परदेशी(40), जावेद मिसबाउद्देन खान (49) यांचा मृत्यू झाला आहे.