शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

भिगवण रेल्वे स्थानकावर  हैदराबाद, मुंबई गाडी न थांबल्यास रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 13:19 IST

एक जुलैपासून दोन गाड्यांचा भिगवण थांबा रद्द : रेल्वे विभागाचा निर्णय

ठळक मुद्देप्रवासी संघ आणि परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण निवेदनाच्या प्रती खासदार सुप्रिया सुळे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री व महाप्रबंधक यांना दिल्या

भिगवण : चाळीस वर्षांपासून अविरतपणे भिगवणरेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांचा थांबा येत्या १ जुलैपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्यावर भिगवण परिसरातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून हा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा रेले रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भिगवण रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष रामहरी चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी संघाची दुगार्माता मंदिरात बैठक झाली. त्यानंतर विविध मागण्यांबाबतचे निवेदन विभागीय रेल्वे प्रबंधक यांना दिले. या वेळी चोपडे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, की ४० वर्षांपासून हैदराबाद, मुंबई आणि मुंबई चिनी या गाड्यांचा थांबा भिगवण येथे आहे. या दोन गाड्यांच्या थांब्यामुळे भिगवण आणि परिसरातील ४० गावांतील नागरिक आणि प्रवासी आपल्या कामासाठी या गाड्यांचा उपयोग करत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रवाशांना अंधारात ठेवून रेल्वे विभागाने गावांचा थांबा रद्द करण्याचा घाट घातला आहे. 

हा थांबा रद्द झाल्यास अनेक प्रवाशांना त्यांच्या शासकीय कामकाज, उपचार आणि नोकरीधंद्यासाठी पुणे आणि मुंबई तसेच राज्यातील अनेक शहरांना जाण्याचा पर्याय बंद होणार आहे...........भिगवण शहराची तालुक्याच्या दिशेने वाटचाल करणारे शहर म्हणून ओळख बनत असताना थांबा बंद झाल्यास अन्यायकारक होईल. त्यामुळे रेल्वे विभागाने तातडीने आपला निर्णय बदलावा, नाही तर रेल रोकोसारख्या तीव्र आंदोलनाला सुरुवात करावी लागणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले..........तसेच, प्रवासी मंडळ गेले अनेक वर्षे मागणी करीत असलेल्या दोन गाड्यांच्या वाढीव थांब्याचा तातडीने विचार करावा, असे निवेदन या वेळी देण्यात आले.

१ जुलैपासून हा थांबा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती प्रवासी संघाला मिळाली. त्यामुळे प्रवासी संघ आणि परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी तयार करण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती खासदार सुप्रिया सुळे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री व महाप्रबंधक यांना देण्यात आल्या. तर, यावर तातडीने निर्णय न झाल्यास याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ................पुणे-दौंड प्रवासी चाकरमान्यांची गैरसोयसकाळी अनेक चाकरमाने आपल्या नोकरीसाठी या रेल्वेगाडीने पुण्याला जातात, तर संध्याकाळी याच गाडीचा वापर करून परतत असतात. तर, व्यापारी वर्गासाठी पर्वणी असणाऱ्या या गाडीचा थांबा बंद झाल्यास अनेक समस्या निर्माण होणार असून पुणे-सोलापूर महामार्गावर त्याचा ताण वाढेल. यामुळे रस्ते अपघातात वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :Bhigwanभिगवणrailwayरेल्वेpassengerप्रवासीSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार