शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘रेल नीर’ने भागतेय स्वस्तात तहान, वर्षभरात पुणे विभागात १६ लाख लिटर पाण्याची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 02:39 IST

रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून ‘रेल नीर’ला पसंती मिळत आहे. पुणे विभागातील विविध स्थानकांवर बसविण्यात आलेल्या पाणीविक्री मशीन (डब्ल्युव्हीएम) मधून मागील वर्षभरात तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री झाली आहे.

पुणे  - रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांकडून ‘रेल नीर’ला पसंती मिळत आहे. पुणे विभागातील विविध स्थानकांवर बसविण्यात आलेल्या पाणीविक्री मशीन (डब्ल्युव्हीएम) मधून मागील वर्षभरात तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री झाली आहे. बाटलीबंद पाणी घेणे न परवडणाºया प्रवाशांची तहान स्वस्तातील रेल नीर भागवत असल्याने प्रतिसाद वाढत आहे.प्रवाशांना शुद्ध आणि कमी दराने पाणी मिळावे, यासाठी इंडियन केटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) एप्रिल २०१७ पासून रेल्वेस्थानकांवर पाण्याच्या मशीन बसविण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेले बाटलीबंद पाणी विकत घेणे अनेक प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे हे प्रवासी स्थानकांवर उपलब्ध असलेल्या पाणपोईवरून पाणी घेतात; पण अनेकदा याठिकाणी स्वच्छता नसल्याने प्रवासी तिथेही जाणे टाळतात. तसेच पाण्याच्या स्वच्छतेबाबतही तक्रारी असतात. त्यामुळे काही जण नाइलाजास्तव न परवडणारे बाटलीबंद पाणी विकत घेतात. त्यामुळे रेल्वेने मागील वर्षीपासून स्थानकांवर पाण्याच्या मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. बाटलीबंद पाण्यापेक्षा अत्यंत कमी दरात हे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पुणे विभागामध्ये काही प्रमुख रेल्वेस्थानकांवर एकूण १४ मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९ मशीन पुणे स्थानकावर आहेत. फलाट क्रमांक एकवर तीन, फलाट क्रमांक २, ३, ४, ५ व ६ वर प्रत्येकी दोन मशीन आहेत. तसेच मिरज स्थानकावर तीन, कोल्हापूर व सांगली स्थानकावर प्रत्येकी एक मशीन बसविण्यात आली आहे. या सर्व मशीनला पाणी शुद्ध करणारी यंत्रणाही बसविण्यात आली आहे. मशीनमधून प्रवाशांना चोवीस तास पाणी उपलब्ध होते. याठिकाणी पाणी देण्यासाठी कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. स्वयंचलित पद्धतीनेही पाणी उपलब्ध होते. रेल्वेच्या दरपत्रकानुसार, अर्धा लिटर पाण्यासाठी केवळ तीन रुपये, तर एक लिटर पाण्यासाठी केवळ पाच रुपये मोजावे लागतात. तसेच, २ लिटर पाण्यासाठी आठ रुपये आणि पाच लिटर पाणी केवळ २० रुपयांत मिळत असल्याने हे पाणी घेण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे.८० लाख रुपयांचे : उत्पन्न मिळालेपुणे विभागात एप्रिल २०१७ पासून या मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तेव्हापासून जुलै अखेरपर्यंत या मशीनमधून तब्बल १६ लाख लिटर पाण्याची विक्री करण्यात आली आहे. यातून विभागाला ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या मशीनमधील प्रत्येक तासाला सुमारे १०० लिटर पाणी मिळू शकते. गर्दीच्या वेळी या मशीनसमोर रांगाही लागतात. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी