शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिरंगुटमधील महावीर ज्वेलर्सवर दरोडा; १८-१९ लाखांचा ऐवज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 15:21 IST

हसमुख ओसवाल यांच्या महावीर ज्वेलर्स या दुकानात (दि. १५ नोव्हें.) रोजी रात्री चोरट्यांनी लोखंडी गजाने शटर उचकटून व लोखंडी जाळीच्या दरवाज्याची कुलुपे तोडून अत्यंत शिताफीने चोरी केली. 

ठळक मुद्दे सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे वायर कट करून कॅमेर्‍याची हार्ड डिस्क, डीव्हीआर चोरून चोरट्यांचा पोबारामागील पंधरा वर्षात हेच दुकान चोरांनी दोन वेळा फोडण्याचा केला होता अयशस्वी प्रयत्न

पौड : पिरंगुट (ता. मुळशी) येथे हसमुख ओसवाल यांच्या महावीर ज्वेलर्स या सोने चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. या दुकानात (दि. १५ नोव्हें.) रोजी रात्री चोरट्यांनी लोखंडी गजाने शटर उचकटून व लोखंडी जाळीच्या दरवाज्याची कुलुपे तोडून अत्यंत शिताफीने चोरी केली. हे दुकान पिरंगुट बस स्थानक पारिसरात मुख्य रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी असूनही चोरांनी दुकानात चोरी कशी केली याचेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वीही दोन दुकान फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला होता. यावेळी मात्र चोरटे यशस्वी झाले. दुकानासमोर व दुकानात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे वायर कट करून चोरट्यांनी कॅमेर्‍याची हार्ड डिस्क व डीव्हीआरही चोरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच सकाळी लवकरच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. देहू रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगूळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. दुकानदाराने दिलेल्या माहिती नुसार दुकानातील अंदाजे ५५० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व १५ ते १६ किलो चांदीचा ऐवज चोरीला गेला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.सदर दुकानाचे सेंटर लॉक तसेच इमर्जन्सी अलार्म मागील काही दिवसांपासून बंद होता. त्यामुळे चोरांनी याचा फायदा घेत व दुकानासमोर आपली मोटार आडवी लावून हा उद्योग केला असल्याने रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही याचा अंदाज आला नाही. शेजारी असलेला एक खासगी दवाखाना व फळविक्रेत्याचे दुकान रात्री बंद असल्याने कोणालाच सदर घटना घडत असताना चाहूल लागली नाही. चोरीच्या घटनांना आळा बसावा याकरिता येथील व्यापारी संघटनेने मागील महिन्यातच पिरंगुट परिसरातील दुकाना समोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते, परंतु सदर कॅमेर्‍यांना हार्ड डिस्कच नसल्याने फुटेज उपलब्ध नसल्याने या चोरीची तपासात गुंतागुंत वाढणार आहे.मागील पंधरा वर्षात हेच दुकान चोरांनी दोन वेळा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. यावेळी चोरांनी मागील काही दिवस दुकानाची व दुकान परिसराची रेकी करून पूर्ण तयारीने येऊन दुकान फोडून चोरी करण्यात यश मिळविले. पिरंगुट परिसरात सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांनी व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :jewelleryदागिनेtheftचोरीPuneपुणे