पिंपळसुटी येथे जुगार अड्ड्यावर छापा; सहा आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:10 IST2021-04-20T04:10:12+5:302021-04-20T04:10:12+5:30
जावेद शेख, सतीश फलके, शिवाजी पवार, बळवंत फलके, भाऊसाहेब फलके, नारायण पल्हारे, दादा काळे, संदीप उर्फ लाल्या सूर्यवंशी अशी ...

पिंपळसुटी येथे जुगार अड्ड्यावर छापा; सहा आरोपी अटकेत
जावेद शेख, सतीश फलके, शिवाजी पवार, बळवंत फलके, भाऊसाहेब फलके, नारायण पल्हारे, दादा काळे, संदीप उर्फ लाल्या सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
कोरोना रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या निर्देशानुसार जमावबंदीचा कलम लागू असताना आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये असे निर्बंध असताना जुगार खेळण्यासाठी आठ जणांनी स्मशानभूमी परिसरात शेडमध्ये गर्दी केली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाड टाकली. त्या वेळी आठपैकी दोघे पळून गेले इतर सहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील ६१० रुपयांची रोकड, ८० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, ५ रुपयांचा पेन असा ८० हजार ६१५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी योगेश आनंदा गुंड यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.