शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी अवैध दारूच्या अड्ड्यावर छापा मारायला गेले अन् मार खाऊन आले; माळेगावमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:43 IST

शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर ...

सांगवी (बारामती, पुणे) :बारामती तालुक्यातील माळेगाव येथे अवैध दारूच्या अड्डय़ावर छापा मारण्यासाठी गेलेल्या दौंड व बारामतीच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लाकडी काठी व दगडाने मारहाण केली. तसेच शासकीय व खाजगी वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवार (दि. २३) रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माळेगाव हद्दीत विक्रमनगर येथे आरोपी यांच्या राहते घरासमोर हा प्रकार घडला. तर मारहाणीत जखमी अधिकारी बारामतीत रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

रात्री अकरा वाजण्याच्या पुढे हे अधिकारी अवैध दारूच्या अड्डय़ावर छापा मारायला गेले होते. दरम्यान जमावाकडून अधिकाऱ्यांना काठी व दगडाने बेदम मारहाण झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन खळबळ उडाली आहे. तर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या धक्कादायक प्रकारामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

या मारहाणीत उत्पादन शुल्क विभागाचे शासकीय वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले आहे. फिर्यादी विजय वसंतराव रोकडे (वय ५५),  यांनी आरोपी किशोर जनार्धन धनगर, पिंटु गव्हाणे व अनोळखी ८ ते १० इसम सर्व रा. विक्रमनगर माळेगाव, ता. बारामती, जि.पुणे. यांच्या विरोधात सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनीयमानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सरकारी वाहन (क्र. एमएच १२टीके ९६९२), व खाजगी वाहन (क्र. एमएच १४ केएफ८०८०) या वाहनांचे नुकसान झाले आहे. 

तसेच मारहाणीत फिर्यादीसह गणेश बाबुराव नागरगोजे (वय ३३), राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक दौंड, सुभाष लक्ष्मण मांजरे (वय ५६), राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक दौंड, प्रविण रामचंद्र सुर्यवंशी (वय ४३) राज्य उत्पादन जवान दौंण्ड, अशोक काशीनाथ पाटील (वय ५०), राज्य उत्पादन शुल्क जवान दौंड, सागर रामचंद्र सोनवले (वय ४०), रा .मळद ता बारामती जि पुणे. हे जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यातील फिर्यादी हे त्यांच्या स्टाफ व पंचासह शासकीय काम करीत असताना यातील आरोपी यांनी बेकायदा जमाव जमवून हातातील काठीने व दगडाने मारहान करुन शिवीगाळी केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करुन शासकीय व खाजगी वाहनांना दगड मारुन काचा फोडण्यात आल्या आहेत. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे