राडारोड्यामुळे जीवितास धोका
By Admin | Updated: January 5, 2015 00:41 IST2015-01-05T00:41:52+5:302015-01-05T00:41:52+5:30
देहूतील इंद्रायणी नदी घाटाच्या दगडी भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही या भिंतीचा राडारोडा

राडारोड्यामुळे जीवितास धोका
पिंपरी : देहूतील इंद्रायणी नदी घाटाच्या दगडी भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही या भिंतीचा राडारोडा अद्यापही घाटावरच पडून आहे. या भिंतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने भाविकांसह नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
देहूतील मुख्य देऊळवाड्याच्या मागील बाजूस इंद्रायणी नदीपात्रात घाटाशेजारीच पूर नियंत्रक दगडी भिंत बांधली आहे. देऊळवाड्याच्या पश्चिम दरवाजाजवळच असलेली ही वीस फूट उंच आणि तीस फूट रुंदीची दगडी भिंत कोसळली आहे. त्याचे सर्व दगड घाटावर आले असून, काही दगड पात्रापर्यंत पोहोचले आहेत. देऊळवाड्यात दर्शनासाठी येणारे भाविक पश्चिमेकडील दरवाजाने खाली उतरून अनेक इंद्रायणी नदीपात्राकडे जातात. त्यामुळे येथील नदी घाटावर भाविकांची नेहमीच गर्दी असते. तसेच कोसळलेल्या भिंतीपासून संत गोरोबाकाका धर्मशाळा आणि वारकरी शिक्षण संस्था दहा फुटांवरच आहे. या संस्थेत निवासी विद्यार्थी आहेत. ‘‘कोसळलेली भिंत
दुरुस्त करण्यासंदर्भात देहू-आळंदी परिसर विकास परिसर समितीला कळविण्यात आले आहे. याबाबत लवकरच त्यांना संस्थानकडून पत्र देण्यात येणार आहे,’’ असे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष रामदास मोरे यांनी सांगितले.
कोसळलेल्या भिंतीचे छायाचित्र काढले आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येणार असल्याचे सरपंच कांतिलाल काळोखे म्हणाले. (प्रतिनिधी)