खंडणीखोरांना यवतमध्ये पाठलाग करून पकडले

By Admin | Updated: October 3, 2014 23:33 IST2014-10-03T23:33:58+5:302014-10-03T23:33:58+5:30

पुण्यातील उद्योजकाला धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणा:या गुंडांना पुणो पोलिसांनी यवतनजीक पाठलाग करून सापळा रचून पकडले. आरोपींकडे एक पिस्तूल व तलवार सापडली आहे.

The racketeers were caught and chased in Yavat | खंडणीखोरांना यवतमध्ये पाठलाग करून पकडले

खंडणीखोरांना यवतमध्ये पाठलाग करून पकडले

>यवत : पुण्यातील उद्योजकाला धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणा:या गुंडांना पुणो पोलिसांनी यवतनजीक पाठलाग करून सापळा रचून पकडले. आरोपींकडे एक पिस्तूल व तलवार सापडली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक विजय झुंबरलाल चोपडा (वय 6क्, रा. 17, ग्रीन पार्क सोसायटी, औंध, पुणो) यांचा स्वत:चा इंजिनिअरिंगचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी वीणा, मुलगा विपुल, सून रिया व नात असे एकत्र राहतात. 
त्यांचा मुलगा विपुल चोपडा हा त्यांचा व्यवसाय संभाळतो. सोमवारी (दि. 29) विजय चोपडा औंध येथील सर्जा हॉटेलमधून जेवण करून परत जात असताना त्यांना अनोळखी मोबाईल क्र.845287483क् वरून फोन आला. समोरून बोलणा:या व्यक्तीने हिंदीमधून बोलताना त्यांचा मुलगा विपुल याला मारायची त्यांना सुपारी मिळाली असल्याचे सांगून, 5क् लाख रुपयांना मारण्याची सुपारी मिळाली आहे, त्याच्या दुप्पट एक कोटी रुपये दिल्यास आम्ही त्याला मारणार नाही असे सांगितले. 
तसेच चोपडा यांच्या कुटुंबातील त्यांची प}ी वीणा, सून रिया, मुलगा विपुल हे कधी कोठे असतात याची सविस्तर माहिती दिली. आम्हाला सगळी माहिती असून, पैसे न दिल्यास त्यांना मारून टाकू, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या विजय चोपडा यांनी ठरलेली रक्कम देण्याचे मान्य केले. 
परंतु रक्कम जास्त असल्याने तीन ते चार दिवस मुदत देण्याची मागणी चोपडा यांनी केली. शुक्रवारी (दि. 3) दुपारी 11 वाजेर्पयत पैसे देण्याची मुभा खंडणी मागणा:यांनी त्यांना दिली होती. तसेच पोलिसांकडे गेल्यास  प्रिय व्यक्तींचे प्राण गमावून बसाल असे धमकावले होते.
दरम्यान, विजय चोपडा यांनी सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील यांच्याकडे याबाबतची तक्रार दिली होती. यानंतर चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सावंत, सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी मागणा:या आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजारामसिंग चौहान, आनंदसिंग साबळे, पोलीस कर्मचारी संजय शिंदे, प्रवीण पाटील, विजय मोरे, शाम सूर्यवंशी, बाळू गायकवाड, शरद पाटील यांचा समावेश होता. 
आज सकाळी ठरल्याप्रमाणो चोपडा यांना मोबाईलवर फोन आला, त्यांना ठरलेली रक्कम घेऊन पुणो-सोलापूर महामार्गावरील यवत येथे येण्यास सांगण्यात आले. तसेच बरोबर कोणीही आणू नये, एकटय़ाने यावे, अशी धमकीदेखील देण्यात आली होती. 
(वार्ताहर)
 
मास्टर माईंड गुंड कोण ?
आरोपी आनंदकुमार भीमषा आळंगी (रा. सिनुर. ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) व चाँद इब्राहिम पठाण (वय 28, रा. सदर) यांना अटक करण्यात आली असून, आरोपी चाँद बताब पठाण हा फरारी झाला आहे.  
 
4पोलिसांनी सदर खंडणी मागणा:यांना पकडण्यासाठी चोपडा यांना ठरल्याप्रमाणो  एकटे जाण्यास सांगितले. परंतु खंडणी मागणारे त्यांच्या पाळतीवर त्यांच्या घरापासूनच असणार याचा अंदाज पोलिसांना घटनाक्रमावरून आला होता. त्यानुसार पोलीस इतर तीन खासगी वाहनांतून चोपडा यांच्याबरोबर जात होते. आरोपी चलाख असल्याने त्यांनी आजूबाजूचा अंदाज बांधणो सुरूकेले होते. पोलिसांच्या एका इनोव्हा गाडीचा संशय खंडणीबहाद्दरांना आला होता. परंतु पोलिसांना अंदाज आल्याने त्यांनी इनोव्हा दूर ठेवली.
4यवत गावच्या जवळ येत असताना कासुर्डी टोल नाक्याजवळ एक पांढरी स्विफ्ट कार ( क्र. एम.एच.14 , सी.एस.क्क्54 ) संशयास्पद रित्या नंबर प्लेट वर चिखल लावून जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्याच गाडीत आरोपी असल्याचे हेरले. तसेच यवत गावापासून पुढे गेल्यानंतर महती कंपनी जवळ आरोपींच्या गाडीला पोलिसांनी धड़क मारून थांबविले. यावेळी फिर्यादी असलेले चोपडा देखिल पोलिसांच्या चपळाई मुळे बचावले .गाडीला धडक बसल्याने आरोपींनी बाजुच्या ऊसाच्या शेतात पळ काढला . आजूबाजुच्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी दोघा  आरोपीना उसात जाऊन पकडले .मात्न एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. आरोपी कडे एक पिस्तोल , एक तलवार मिळून आली आहे.

Web Title: The racketeers were caught and chased in Yavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.