शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
3
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
6
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
7
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
8
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
9
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
10
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
11
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
12
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
13
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
14
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
15
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
16
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
17
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
18
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
19
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
20
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये

अणुबॉम्बपेक्षा जातीय विषमता स्फोटक : डॉ. बाबा आढाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:07 IST

आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे : डॉ. बाबा आढाव

ठळक मुद्देवर्षा गुप्ते यांना लोकनेते भाई वैद्य स्मृती पुरस्कारचळवळींमध्ये कार्य करणा-यांनी सतत आत्मपरीक्षण करणे गरजेचे

पुणे : समानता हे समाजवादाचे मुख्य सूत्र आहे. समाजातील वंचितांच्या मार्गातील अडथळे दूर करुन त्यांना प्रगतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा गरजेची आहे. आपल्या देशात आजही जातीय विषमतेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. अणुबॉम्बपेक्षा स्फोटक असलेली ही विषमता दूर करणे हे मोठे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. चळवळींमध्ये कार्य करणा-यांनी सतत आत्मपरीक्षण करून आपण नेमके कुठे कमी पडलो, याचाही विचार केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ज्ञान फाऊंडेशनतर्फे पहिला लोकनेते भाई वैद्य स्मृती कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेत्या वर्षा गुप्ते यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी आढाव बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, सचिन शिंदे आणि अर्चना मुंद्रा उपस्थित होते.  आढाव म्हणाले, आर्थिक, सामाजिक अशा सगळ्याच क्षेत्रातील विषमता मानवी जीवन पोखरत असून ही विषमता दूर करण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन अधिक काम करण्याची गरज आहे. शोषणाची जाणीव ही शोषणाविरूद्ध लढण्याची पहिली पायरी असते. समाजाची प्रगती ही त्या समाजातील चिंतनशीलता आणि कलात्मक सृजनशीलता यांच्यातून प्रतीत होत असते. भारतीय विचार देशवासीयांच्या मनाच्या तळापर्यंत झिरपवत नेणे गरजेचे आहे.  डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत धर्मनिरपेक्षता, जातीअंताचे स्वप्न, सार्वभौमत्व आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. नक्षलवाद्यांचे शिक्के मारून पुरोगाम्यांना डांबण्याचे षडयंत्र देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. प्रशासकीय यंत्रणा भेदून टाकण्याचा सत्ताधा-यांचा डाव असून त्यादृष्टीने सुरू असलेली वाटचाल फारच दुर्दैैवी आहे.गुप्ते म्हणाल्या, आजपर्यंत केवळ काम हाच पुरस्कार मानून मी माझ्या मार्गावर कार्यरत राहिले. भाईंच्या विचारांच्या शिदोरीने एका सर्वसामान्य स्त्रीचे रुपांतर कार्यकर्तीमध्ये झाले. समाजवादी विचारांनी माज्या जीवनाला दिलेली दिशा सार्थकी लागण्यासाठी शेवटपर्यंत मी या मार्गावर कार्यरत राहणार आहे.  यावेळी प्रतिकूल परिस्थितीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले झोपडपट्टीतील विद्यार्थी अनिकेत पिल्ले,अनिकेत तिंडे, रागिणी गंगावणे, मुस्कान शेख आणि सूरज खांदवे यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ममता क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञान फाऊंडेशनचे विश्वस्त दिपक ढमाले यांनी आभार मानले. 

टॅग्स :PuneपुणेBhai Vaidyaभाई वैद्यBaba Adhavबाबा आढाव