खरीपाच्या नुकसानीनंतर रब्बी पिके धोक्यात उत्पन्नात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST2020-12-16T04:28:07+5:302020-12-16T04:28:07+5:30

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाने रब्बी पिके धोक्यात आलेली आहेत, उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे. ...

Rabi crops are at risk after kharif losses | खरीपाच्या नुकसानीनंतर रब्बी पिके धोक्यात उत्पन्नात घट होण्याची शक्यता

खरीपाच्या नुकसानीनंतर रब्बी पिके धोक्यात उत्पन्नात घट होण्याची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाने रब्बी पिके धोक्यात आलेली आहेत, उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली आहे. या रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने कांदा, गहू, मका, हरभरा,आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहे. पण निसर्गाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, तसेच या वातावरणातील बदलामुळे आणि थंडी कमी असल्याने गहू पिकावर मावा आला आहे.

यासोबतच हरभरा, मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सोबतच मर, करपा, मावा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रबी हंगामातील सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. त्यात कांदा, गहू, हरभरा या पिकांना थंडी आवश्यक असते पण थंडीच गायब झाली आहे,

कांदा लावगडीपासून शेतकऱ्यांना एक एकरी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत आहे, तरीही शेतकरी कांदा पिकासाठी धडपड करताना दिसत आहे.

--

परिसरातील कुरुळी, चिंबळी, निघोजे, मोई, आदी शेतकऱ्यांनी कांद्याची काही प्रमाणात लावगड केली आहे. मात्र मागे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी टाकलेल्या कांदा-रोपे गेल्याने बऱ्याच ठिकाणी भाजीपाला पिकाची लागवड केली, परंतु मोठ्या प्रमाणावर भाजीपाला तयार झाल्याने भाजीपाल्याचे भाव देखील ढासळले, ढगाळ वातावरण व भाव नसल्याने भाजीपाला पीक घेणे अवघड झाले आहे, हे वातावरण आणखी काही दिवस असेच राहिल्यास केलेला खर्चही वसूल होईल का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

--

Web Title: Rabi crops are at risk after kharif losses