शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

रा. स्व. संघाची ‘सेवा गाथा’ आॅनलाइन; सक्सेस स्टोरी असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 01:38 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागामार्फत देशभरामध्ये राबविण्यात येत असलेल्या तब्बल १ लाख ७० हजार सेवा प्रकल्पांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

पुणे  - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागामार्फत देशभरामध्ये राबविण्यात येत असलेल्या तब्बल १ लाख ७० हजार सेवा प्रकल्पांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ‘सेवा गाथा’ या नावाने मराठीमधील संकेतस्थळ लवकरच सुरू होणार असून, नव्या वर्षामध्ये या संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘सक्सेस स्टोरी’सुद्धा नागरिकांसमोर आणण्याचा उद्देश आहे.संघाच्या स्थापनेनंतर देशभरामध्ये संघकार्यासाठी गेलेल्या अनेक प्रचारकांनी सेवा प्रकल्प सुरू केले. आरोग्य, शिक्षण, सामाजिक, स्वावलंबन, महिला आदी क्षेत्रात काम सुरू आहे. वनवासी कल्याण आश्रमापासून शहरी भागातील दलित, उपेक्षित घटकांसाठीची शेकडो सेवा कार्यही सुरू आहेत.संघ विविध क्षेत्रात काम करतोय तशाच प्रकारे संघाकडून सामाजिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याची माहिती समाजासमोर यावी या उद्देशाने हे संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पांमधील ‘सक्सेस स्टोरीज’ समाजापुढे याव्यात असे सुचविले होते. त्यानुसार, मराठीमध्ये हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर स्वयंसेवकांनी केलेल्या मदत आणि बचावकार्याचीही माहिती देण्यात येणार आहे. यासोबतच चित्रकुटच्या नानाजी देशमुखांपासून छत्तीसगडच्या चांपा भागात करणारे कात्रेगुरुजी, कर्नाटकच्या दुर्गम भागात काम करणारे अजित कुमार, उत्तराखंडच्या प्रलयानंतर पर्यावरणपूरक विकास मॉडेलचे प्रेरक आणि त्यामधून अनेक गावांची उभारणी करणारे डॉ. नित्यानंद, सेवा भारतीचे विष्णू कुमार, वनवासी कल्याण आश्रमाचे रमाकांत देशपांडे आदी संघ स्वयंसेवक आणि सेवाब्रतींची माहिती दिली जाईल.संघाच्या माध्यमातूनसंघाच्या माध्यमातून देशभरात आरोग्य क्षेत्रात २५ हजार १३६, शिक्षण क्षेत्रात ८९ हजार ९२६, सामाजिक क्षेत्रात ३८ हजार ९०९, स्वावलंबन क्षेत्रात २० हजार ५४८ सेवा कार्यसुरू आहेत. संघ स्वयंसेवकांसोबतच सर्वसामान्य नागरिक, अभ्यासकांनाही या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपयुक्त माहिती मिळणार आहे.यापूर्वी संघाने देशभर पसरलेल्या सेवा कार्यांचा आढावा घेणारे ‘सेवा सरितांचा अमृतकुंभ’ नावाचे पुस्तक मराठीमध्ये प्रसिद्ध केले होते. मात्र, या पुस्तकात काही मोजक्याच प्रकल्पांची माहिती होती. त्यामुळे अधिक व्यापक स्तरावर संघाच्या सेवा प्रकल्पांची माहिती या संकेतस्थळाद्वारे मिळणार आहे.नेपाळ, मणिपूर, गुजरात, बिहार, केरळ, उत्तराखंड, राजस्थान आदी भागांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी केलेल्या मदत व बचाव कार्याचीही माहिती सचित्र अपलोड करण्यात येणार आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPuneपुणे