विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST2020-12-04T04:32:20+5:302020-12-04T04:32:20+5:30
सकाळी साडेसात आणि दुपगारी बाराला मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० ...

विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा
सकाळी साडेसात आणि दुपगारी बाराला मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली.येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी,खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली. सायंकाळी ७.०० वा नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत ह.भ.प गणेश महाराज वाघमारे यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ शिरोली खुर्द यांनी दिली. संभाजी बोडके यांनी वारकऱ्यांना अन्नदान केले. रात्री १०.३० वाजता शेजआरती करून अकरा वाजता मंदिर बंद करण्यात आले.
--
फोटो ०३ ओझर विघ्नेश्वर संकष्टी
फोटो मजकूर, दीर्घ विश्रांतीनंतर श्रींचे दिसणारे मनमोहक रूप व श्रींच्या समोर फळांची केलेली आरास