शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महिला नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 6:54 AM

ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.

पुणे : शहरात राजरोस भटकी कुत्री नागरिकांवर हल्ला करतात. महिन्याला हजारो नागरिक गंभीर जखमी होतात. याबाबत प्रशासनाकडून केवळ आकडेवारी सांगितले जाते; परंतु भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. कुत्र्यांपेक्षा माणसांचा जीव स्वस्त झाला का, असा उद्विग्न सवाल करत सोमवारी महापालिकेच्या सभेत बहुतेक सर्वच महिला नगरसेविकांनी आक्रमक भूमिका घेतली.ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना वेळेवर रेबीज इंजेक्शनही मिळाले नसल्याचे नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. नागरिकांवर हल्ले होत आहे. पालिका प्रशासनाकडून केवळ आकडेवारी सांगितली जाते. कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्राणिमित्र दिल्लीला फोन करतात आणि कारवाई थांबते, अशी टीका एकबोटे यांनी केली.शहरातील सर्वच भागातील नगसेवकांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून, पालिका प्रशासन प्रतिबंधात्मक कारवाई करत नसल्याचा आरोप केला. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगतिले की, शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत यापूर्वी पर्यावरण सभा व सर्वसाधारण सभेत अनेक वेळा चर्चा झाली. याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रशासनाकडून नसबंदीबाबत खोटी आकडेवारीदेखील दिली जात आहे. नंदा लोणकर म्हणाल्या की, उपनगरांमध्ये कुत्र्यांचा आणि डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च होतात; मात्र कारवाई काहीच दिसत नाही.याबाबत प्रभारी आरोग्यप्रमुख संजीव वावरे यांनी खुलासा करताना सांगितले की, महापालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. मागिल वर्षी यासाठी तब्बल ७२ लाख रुपये खर्च करण्यात आले. यावर्षी तब्बल २ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून, ३५ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.नसबंदी केल्यानंतर पिलांना जन्ममहापालिका लाखो रुपये खर्च करून शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करत असल्याचे सांगितले; परंतु आमच्या भागामध्ये नसबंदी केलेल्या कुत्र्यांना पिले झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून देण्यात येत असलेली आकडेवारी फसवी असून, यामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप नगरसेविका कालिंदी पुंडे यांनी केला.उंदरांसारखा कुत्र्यांचा प्रकारहिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रालयातील उंदीर मारण्याचा विषय चांगला गाजला. मंत्रालयामधील उंदीर मारण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. त्याचप्रमाणे महापालिका कुत्र्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असून परिस्थिती नियंत्रणात येत नाही. त्यामुळे मंत्रालयातील उंदरांप्रमाणे महापालिकेतील कुत्र्यांचा प्रकार झाला असल्याचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी सभागृहात सांगितले. 

टॅग्स :dogकुत्राPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका