अकरावी सीईटीसाठी एससीईआरटीकडून सरावासाठी प्रश्नसंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:13 IST2021-07-07T04:13:47+5:302021-07-07T04:13:47+5:30
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर ...

अकरावी सीईटीसाठी एससीईआरटीकडून सरावासाठी प्रश्नसंच
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु,राज्य मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच हवे आहेत का, असा प्रश्न एससीईआरटीने विचारला आहे. विद्यार्थी व पालकांकडून मागणी झाल्यास एससीईआरटी प्रश्नसंच उपलब्ध करून देणार आहे.
इयत्ता दहावीचा निकाल यंदा शाळा स्तरावर शिक्षकांकडून देण्यात आलेल्या गुणांच्या आधारे जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश देणे सयुक्तिक ठरणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश मिळण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात. त्यामुळे सीईटी परीक्षा घेणे योग्य आहे, असा एक मतप्रवाह आहे.
सर्वसाधारणपणे दर वर्षी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. दहावीच्या निकालाची कामकाज अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रश्न संच उपलब्ध करून देण्याबाबत एससीईआरटीकडून विचार केला जात आहे.