शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 11:42 IST

चाकूहल्ला प्रकरण

ठळक मुद्दे प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊल उचलण्याचा घेतला निर्णय सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानावर एका तरुणावर व त्याच्या मित्रांवर अनोळखी व्यक्तीने चाकूसारख्या हत्याराने वार केल्याची घटना नुकतीच घडली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.शाहरुख शेख (वय २३ रा. दापोडी) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी एका अनोळखी सायकलस्वार व्यक्तीविरोधात गुन्हा दखल केला आहे. शाहरुख शेख हे त्यांच्या मैत्रिणीसह विद्यापीठाच्या मैदानात गप्पा मारत बसले होते. त्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याबरोबर गैरसमजातून भांडण केले. त्यामुळे शेख यांनी भांडण सोडविण्यासाठी त्यांचा भाऊ अझर शेख व त्याचा मित्र चेतन येडल्लू यांना बोलवले. परंतु, अनोळखी व्यक्तीने या तिघांवर चाकूसारख्या हत्याराने वार करून त्यांना जखमी केले. पोलिसांकडून या अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. विद्यापीठाचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. फिर्यादी व आरोपी हे सर्व विद्यापीठाबाहेरचे आहेत, असे पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. माळेगावे यांनी सांगितले.काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठाच्याच सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देत विद्यापीठात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तसेच पोलिसांकडून सुरक्षा ऑडिट करून संरक्षक भिंत बांधून घेतली. तसेच, सुरक्षारक्षकांची संख्या वाढविली. सद्य:स्थितीत विद्यापीठात महत्त्वाच्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक व होमगार्ड नियुक्त केले आहेत. सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे.विद्यापीठातील दोन विद्यार्थी संघटनांमध्ये काही महिन्यांपूर्वी जोरदार हाणामारी झाली होती. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ५ मध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली. त्यामुळे विद्यापीठात बेकायदेशीपणे राहून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाºया विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे...................

सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावेविद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस निर्णय घेतला आहेत. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून येणाºया प्रत्येकाची चौकशी केली जाईल. त्यानंतरच त्याला विद्यापीठात प्रवेश मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यापीठात काही कामानिमित्त येणाºया व्यक्तींची गैरसोय होऊ शकते.परंतु, विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.

 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर