शुद्ध पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

By Admin | Updated: November 27, 2014 23:08 IST2014-11-27T23:08:33+5:302014-11-27T23:08:33+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणा:या 16 गावांतील 18क् पाणी नमुन्यांपैकी 1क्क् मध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.

A question about pure water on the anagram | शुद्ध पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

शुद्ध पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

तळेगाव ढमढेरे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणा:या 16 गावांतील 18क् पाणी नमुन्यांपैकी  1क्क् मध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भीमानदी काठालगत 12 गावे व इतर 4 गावे आहे. नदी काठालगतच्या गावांमधील सार्वजनिक विहिरी, सरकारी हातपंप यामध्ये क्षार व नायट्रेटच्या प्रमाणात दिवस-दिवस वाढ होत असल्याचे पाणी नमुना चाचण्यांमधून आढळून आले आहे.
सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वर्षातून जैविक पाणी नमुना चाचणी दोन वेळा राज्य आरोग्य प्रयोग शाळा येथे तपासणीसाठी पाठवले जाते. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, शिवतक्रार म्हाळुंगी, टाकळी-भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, बुरुंजवाडी, शिक्रापूर, सणसवाडी, दरेकरवाडी, धानोरे, वाडा पुनर्वसन, कोरेगाव भीमा, डिग्रजवाडी या 16 गावांचे रासायनिक पाणी नमुने तपासणीसाठी 29 मार्च 14 रोजी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. या वेळी 18क् पाणी नमुन्यांपैकी 1क्क् पाणी नमुन्यांमध्ये जास्तीत जास्त नायट्रेटचे व क्षारांचे प्रमाण वाढल्याचे आढळले. या 16 गावांचे पाणी दूषित असल्याचे दिसले.
 
दूषित नमुना
जैविक पाणी नमुना चाचणीसाठी सप्टेंबरमध्ये 31 पैकी 3 दूषित यामध्ये विठ्ठलवाडी, वाडा पुनर्वसन, पारोडी या गावात प्रत्येक 1 पाणी नमुना दूषित असल्याचे आढळले. ऑक्टोबर महिन्यात 38 पैकी 5 पाणी नमुने दूषित आढळले. यामध्ये वाडा पुनर्वसन, दरेकरवाडी, विठ्ठलवाडी, शिवलकर, म्हाळुंगी व पारोडी प्रत्येकी एक असे पाच नमुने दूषित आढळले, तर नोव्हेंबरमध्ये 29 पैकी 5 दूषित आढळले. यामध्ये सणसवाडीचे 2 व शिक्रापूरचे 3 पाणी नमुने दूषित आढळून आले.
 
देखभालीचा खर्च भरपूर
देखभाल दुरुस्ती खर्च ग्रामपंचायतींना परवडणारा नसल्याने हे पाणी 2क् लिटरचे कॅन दोन रुपये, तर काही ठिकाणी 5 रुपये प्रमाणो माफक किमतीत विकले जात आहे. सध्या अनेक लोक हे पाणी अथवा फिल्टरचेच खासगी पाणीविक्रेत्यांकडूनही 2क् लिटरचे कॅन 1क् रुपयांपासून 2क् रुपयांर्पयत विकत घेऊन आपली तहान भागवत आहेत. यामुळे मात्र सर्वसामान्य कुटुंबाला पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे मात्र वास्तव आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकही विकतचेच पाणी घेऊन व्यवसाय करीत आहेत.
 
4तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे व आरोग्य सहायक एस. आर. लवांडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीचे जल सुरक्षा कर्मचारी यांच्याकडून पाणी शुद्धीकरण करून घेण्याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभाग व मुख्य कार्यकारी अधिकारी लेखी स्वरूपात आदेश दिले जातात.
4पुणो नगरपालिका व जिल्हा परिषद पुणो यांच्या माध्यमातून नदीकाठच्या बहुतांश गावांमध्ये जलशुद्धीकरण योजना (एरोफिल्टर मशिन) बसविण्यात आलेल्या आहेत. 

 

Web Title: A question about pure water on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.