शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत ४१ डॉक्टर व कर्मचारी क्वारंटाईन; अपघातासाठी उपचार घ्यायला आलेला रिक्षा चालक कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 16:28 IST

खडकीतील एक रिक्षा चालक ३१ मार्च रोजी अपघात झाला म्हणून उपचार घेण्यासाठी डॉ. डी. वाय पाटील रूग्णालयात आला होता...

ठळक मुद्देशस्त्रक्रियेपूर्वी श्वसनाचा त्रास होऊ लागला म्हणून त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीकडे

पिंपरी : अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी रूग्णालयात आणले असताना तपासणीत संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील रूग्णालयातील ४१  डॉक्टर, सहायक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे. रविवारी एनआयव्हीकडे संशयितांच्या घशातील द्रवाचे नमुने पाठविले आहेत. त्याचा अहवाल आज अपेक्षित आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.पिंपरीतील संत तुकारामनगर येथे डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे. या रूग्णालयात दि. ३१ मार्च रोजी खडकीतील एक  रिक्षा चालक अपघात झाला म्हणून उपचार घेण्यासाठी डॉ. डी. वाय पाटील रूग्णालयात आला होता. त्यावेळी त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची असल्याने त्यांना पहिल्यांदा तातडीक वॉर्डात दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर त्याचा फिटनेस तपासण्यात आला. भूलतज्ज्ञ, सोनोग्राफी, ऑपरेशन थिएटर अशा विविध विभागात नेण्यात आले. शस्त्रक्रियेपूर्वी त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला म्हणून त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयाच्या माध्यमातून पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. त्यानंतर एनआयव्हीचा अहवाल शनिवारी (दिनांक ३ मार्च ) रात्री अकराला आला. त्यात संबंधित रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.* ४१ जणांचे घश्यातील द्रवाचे नमुने तपासणीसाठीरूग्णालयातील रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब महापालिका प्रशासन आणि रूग्णालय प्रशासनास कळल्यानंतर तातडीने रूग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर, सहकारी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी अशा एकुण ४१ जणांचे घश्यातील द्रवाचे नमुने रविवारी एनआयव्हिकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचा अहवाल आज सायंकाळपर्यंत अपेक्षीत आहे.* रूग्णालयाचे निर्जुंतीकरणदरम्यान रूग्णालयाचे निर्जुंतीकरण करण्यात आले असून रूग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना क्वारंटाईन केले आहेत. एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविलेले अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना सोडून देण्यात येईल, असे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, डीवाय पाटील रूग्णालयात उपचारासाठी आलेला रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने रूग्णाच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारिका आणि रूग्णालयीन स्टाफ यांची तपासणी केली आहे. निजुर्तीकरण केले आहे. सर्व दक्षता घेतल्या असून सर्वांना कॉरंटाईन केले आहे. त्यांचे अहवाल आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहेत. डॉ. डी. वाय पाटील विद्यापीेठाचे कुलपती डॉ. पी. डी पाटील म्हणाले, अपघात झाला म्हणून संबंधित रूग्ण उपचारासाठी आला होता. रूग्णसेवेसाठीच आमचे रूग्णालय आहे. शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दक्षता म्हणून रूग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना रूग्णालयातच क्वारंटाईन केले आहे.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसauto rickshawऑटो रिक्षा