वीजबिलाला क्यूआर कोडची जोड
By Admin | Updated: March 22, 2017 03:29 IST2017-03-22T03:29:33+5:302017-03-22T03:29:33+5:30
महावितरणने वीजबिलाला नवा चेहरा दिला असून, सुटसुटीत माहितीसह मोबाईल अॅप थेट डाऊनलोड करण्यासाठी या बिलामध्ये क्यूआर कोड

वीजबिलाला क्यूआर कोडची जोड
पुणे : महावितरणने वीजबिलाला नवा चेहरा दिला असून, सुटसुटीत माहितीसह मोबाईल अॅप थेट डाऊनलोड करण्यासाठी या बिलामध्ये क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महावितरणचे नव्या स्वरूपातील वीजबिल वीजग्राहकांना वितरीत करण्यात येत आहे. जुन्या वीजबिलाच्या तुलनेत ते अधिक सुटसुटीत असून, त्याची रंगसंगती देखील आकर्षक करण्यात आली आहे. या बिलात असलेल्या क्यूआर कोडद्वारे वीजग्राहकांच्या सेवेसाठी असलेले महावितरणचे मोबाईल अॅॅप डाऊनलोड करता येत आहे. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड केलेल्या क्यूआर कोड रीडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाईल अॅपची लिंक उपलब्ध होत आहे. त्याद्वारे हे अॅप डाऊनलोड करता येणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे वीजबिलावरील क्यूआर कोड हा ‘अॅॅन्ड्राईड’, ‘विन्डोज’ व ‘आयओएस’ या आॅपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे.
महावितरणने विविध ग्राहकसेवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या अॅॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ११ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरण मोबाईल अॅॅप डाऊनलोड केला आहे. या अॅपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) नवीन वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबँकिंग, के्रडिट-डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय असून, भरलेल्या पावतीचा तपशीलही देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)