महिला सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:31+5:302021-05-14T04:10:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विनामास्क दुचाकीवर बसून प्रवास करत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असताना गाडी ...

Pushback to female assistant police inspector | महिला सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

महिला सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विनामास्क दुचाकीवर बसून प्रवास करत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असताना गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला दोघांनी धक्काबुक्की केली.

अ‍ॅन्थोनी सेबस्टिसन डिलिमा (वय ६९) आणि अलिशा अ‍ॅन्थोनी डिलिमा (वय ३२, दोघे रा. सोपानबाग, घोरपडी) यांनी खडकी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस अंमलदार विद्या पोखरकर यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास आंबेडकर चौक औंध बोपोडी परिसरात घडली.

फिर्यादी व महिला सहायक पोलीस निरीक्षक खडकीतील डॉ. आंबेडकर चौकात विनामास्क नागरिकांवर कारवाई करत होते. यावेळी दुचाकीवरून डिलिमा बापलेकी आल्या. पोखरकर यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी न थांबता पोखरकर यांच्या पायावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे बसलेल्या अलिशा हिला मास्कबाबत विचारणा केल्यावर तिने तू मास्क विचारणा करणारी कोण आहे. तुझी नोकरीच घालवते, अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pushback to female assistant police inspector