हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
By Admin | Updated: February 8, 2017 02:50 IST2017-02-08T02:50:00+5:302017-02-08T02:50:00+5:30
हवेली तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसलाच धक्का बसला

हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
पुणे : हवेली तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसलाच धक्का बसला असून, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या पेरणे गणातील महिला उमेदवार संजीवनी उमेश कापरे व थेऊर गणातील कावेरी विलास कुंजीर यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या वतीने दोन ठिकाणी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने याबाबत पेच निर्माण झाला असून, जिल्हा परिषदेचा ठेकेदार असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या एका उमेदवारावर हरकत घेण्यात आली आहे. हवेली तालुक्यात तब्बल २६ गण असून, रात्री उशीरा पर्यंत छाननी सुरु होती.
जिल्हा परिषदेच्या गटासाठी हवेली तालुक्यात १३ जागांसाठी १५३ उमेदावरांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी सुमारे ७ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले असून, तीन अर्जां वरील निर्णय राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब मोकाक्षी व भरत वांजळे या दोघांनाही पक्षाचा एबी फॉर्म दिल्याने व उरुळीकांचन-सोरतापवाडी या गटामध्ये देखील हाच पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधा संजय हरपळे, ऊरूळी कांचन -सोरतापवाडी गटातील अपक्ष उमेदवार लिलावती बापूसाहेब बोधे यांचा अर्ज बाद झाला. तसेच थेऊर लोणीकाळभोर गटातून अपक्ष उमेदवार नम्रता प्रशांत कांबळे, स्वाती नामदेव सपकाळ,निर्मला शंकर अडसूळ
तसेच धायरी नांदेड गटातून पूनम नंदकुमार देवकर यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.(प्रतिनिधी)