मसापच्या पुसाळकर स्मृती पुरस्कार ‘अक्षरदालन’ प्रकाशनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:02 IST2020-12-02T04:02:01+5:302020-12-02T04:02:01+5:30

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी सुविचार प्रकाशन मंडळ पुरस्कृत ‘कै. पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार’ ...

Pusalkar Smriti Award of MCA for publishing 'Akshar Dalan' | मसापच्या पुसाळकर स्मृती पुरस्कार ‘अक्षरदालन’ प्रकाशनाला

मसापच्या पुसाळकर स्मृती पुरस्कार ‘अक्षरदालन’ प्रकाशनाला

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी सुविचार प्रकाशन मंडळ पुरस्कृत ‘कै. पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार’ दिला जातो. यंदाच्या पुरस्कारासाठी, साहित्यिक आणि प्रकाशक प्रा. रुपाली अवचरे आणि चित्रकार जयदीप कडू यांच्या निवड समितीने ‘अक्षरदालन’ प्रकाशन कोल्हापूरच्या ‘सह्याद्रीच्या गिरिशिखरावरून - भाग १ व २’ (लेखक डॉ. अमर अडके) या ग्रंथाची निवड केली आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १० डिसेंबरला पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

Web Title: Pusalkar Smriti Award of MCA for publishing 'Akshar Dalan'