शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लवकरच रंगणार पुरुषोत्तम करंडकाचा थरार.... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:16 IST

महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षास जूनमध्ये सुरूवात झाल्यानंतर कलाप्रेमी विद्यार्थ्यांना वेध लागतात ते पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे..

ठळक मुद्देआंतरमहाविद्यालयीन स्पर्धा : १४ व १५ जुलैला होणार प्रवेश अर्जांचे वाटप

पुणे : अरे आव्वाज कुणाचा.. हिप हिप हुर्रे...शिट्या, दर्जेदार विषय, यांतून रंगमंचावर उतरलेला  कॉलेजवयीन कलात्मकेचा आविष्कार यांचा सुरेख संगम असलेली व महाविद्यालयीन विश्वाचे अविभाज्य अंग म्हणून परिचित अशा पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या जल्लोषाला लवकरच सुरूवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्रवेश अर्जांच्या वाटपाची घोषणा करण्यात आली आहे. उद्या (१४ जुलै) आणि परवा (१५ जुलै) रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत विवेक अपार्टमेंट सुभाषनगर येथे प्रवेश अर्ज उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षास जूनमध्ये सुरूवात झाल्यानंतर कलाप्रेमी विद्यार्थ्यांना वेध लागतात ते पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे.. जुलै महिन्यामध्येच स्पर्धेच्या प्रवेश अर्जाच्या वितरणाला सुरूवात होते. त्यानंतर संहिता ठरवून एकांकिकांच्या तालमींचा श्रीगणेशा होतो. येत्या १४ व १५ जुलैला स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या प्रवेश अर्जांचे वाटप केले जाणार आहे. संघांनी महाविद्यालयाच्या लेटर हेडवर चिटणीस, महाराष्ट्रीय कलोपासक यांच्या नावाने तुमच्या महाविद्यालयाला फॉर्म मिळावा असा अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच लेटर हेड वर महाविद्यालयाचा राउंड शिक्का आणि  प्राचायार्ची सही शिक्का असणे अनिवार्य आहे. लेटर हेड वर अर्ज नसल्यास फॉर्म मिळणार नाही, याशिवाय गतवर्षीच्या बॉटम टेन आणि नवीन वेटिंग लिस्टवाल्या महाविद्यालयांनी वरील सर्व बाबी पूर्ण करून १५ जुलै  रोजी ७.३० वाजता वरील पत्यावर उपस्थित राहावे सर्वांच्या उपस्थितीत ड्रॉ पद्धतीने प्रवेश अर्ज देण्यात येईल, असेही संस्थेतर्फे सूचित करण्यात आले आहे.  

टॅग्स :Puneपुणेartकलाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीTheatreनाटक