शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Purushottam Karandak: ‘भानगड’ची पुरुषोत्तम करंडकावर मोहोर; महाअंतिम फेरीचा निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 10:20 IST

औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

पुणे : करंडक कुणाला मिळणार? या प्रश्नाने विद्यार्थ्यांची हुरहूर वाढलेली...सर्वांच्याच काळजाची धडधड वाढली असतानाच ‘भानगड’ या एकांकिकेचे नाव उच्चारताच औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे, सर्वोत्कृष्ट एकांकिकेसह ‘अभिनय नैपुण्य स्त्री' आणि ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शना'चे पारितोषिकही याच एकांकिकेला मिळाले.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे भरत नाट्य मंदिर येथे रंगलेल्या पुरूषोत्तमच्या महाअंतिम फेरीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जल्लोष आणि अरे आव्वाज कुणाचा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सांघिक प्रथम क्रमांक औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तर द्वितीय क्रमांक बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘भू-भू ' या एकांकिकेला तर तृतीय क्रमांक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘कुपान' या एकांकिकेने पटकावला. साखराळे येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘तुम्ही ऑर नॉट टू मी’ या एकांकिकेला ‘सर्वोत्कृष्ट प्रायोगिक करंडक' मिळाला.

पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे आयुक्त (सवलत) अभिनय कुंभार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. राजेश पांडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर उपस्थित होते. संजय पेंडसे (नागपूर), सुबोध पांडे आणि नितीन धुंदके (दोघेही पुणे) यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. सूत्रसंचालन आणि आभार राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी मानले.      

आयुष्यभर कलावंताची मुशाफिरी अनुभवणे हे जगण्याचे मर्म                                            

अभिनेता कसा बोलतो, चालतो, प्रतिसाद देतो, ध्वनी-प्रतिध्वनी कसा उमटतो या सगळ्या बारकाव्यांसहीत स्वत:ला आयुष्यभर आजमावण्याचा प्रवास म्हणजे ‘कलावंत’ होणे असते. कलावंत होणे एकवेळ ठीक आहे; परंतु आयुष्यभर कलावंताची मुशाफिरी अनुभवणे हे जगण्याचे मर्म आहे, असे मत कुंभार यांनी यावेळी मांडले.

रंगधर्मी आणि रंगकर्मी व्हा

नाटक हे एकच माध्यम आहे, जे तुम्ही आहात तसे तुम्हांला दाखवतो. त्यामुळे नाटक महत्त्वाचे आहे, ते करत राहा. रंगधर्मी आणि रंगकर्मी व्हा. - नितीन धुंदके, परीक्षक

परीक्षकांची निरीक्षणे 

- सामाजिक प्रश्नांपेक्षा विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील विषय हाताळण्याची गरज- लेखन हा नाटकाचा गाभा, त्यावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज- ध्वनीचा मर्यादित वापर करून वाचिक अभिनयाला अधिक महत्त्व द्यावे- रंगभूमीची नवीन परिभाषा शोधून प्रस्थापित चौकट मोडणे गरजेचे

अन्य पारितोषिके 

सर्वोत्कृष्ट अभिनय - संस्कार लोहार (बिराड)अभिनय नैपुण्य पुरुष - सनी पवार (भू-भू)अभिनय नैपुण्य स्त्री - वैष्णवी काळे (भानगड)सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य - शौनक कुलकर्णी (गाभारा)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल नरवडे (भानगड)

उत्तेजनार्थ पारितोषिक

मयुरी निकम (भू-भू), गोविंद रेंगे (भानगड), शुभम गोविलकर (कुपान), आकांक्षा पवार (गाभारा), सुजाता सपकाळ (फराळ), लोकेश मोरे (कंदील), अमितकुमार मांडवे (आम्ही सगळे), स्वानंद कुलकर्णी (कलिगमन), संकेत मुंढे (तुम्ही ऑर नॉट टू मी), रचना अहिरराव (पडदा)

टॅग्स :Puneपुणेartकलाcultureसांस्कृतिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय