खुनामागील उद्देश सिद्ध होत नाही

By Admin | Updated: March 23, 2017 04:38 IST2017-03-23T04:38:34+5:302017-03-23T04:38:34+5:30

आरोपींनी नयना पुजारी हिला पळवून नेऊन तिच्या वस्तू लुटून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

The purpose behind the murder is not proved | खुनामागील उद्देश सिद्ध होत नाही

खुनामागील उद्देश सिद्ध होत नाही

पुणे : आरोपींनी नयना पुजारी हिला पळवून नेऊन तिच्या वस्तू लुटून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप असताना सरकार पक्षाने हा खून त्यांनी कोणत्या हेतूने अथवा उद्देशाने केला हे सबळ पुराव्यानिशी न्यायालयात सिद्ध केले नाही अथवा आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध होण्याच्या दृष्टीने सखोल तपास केलेला दिसून येत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने बुधवारी करण्यात आला़
या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. अ‍ॅड़ अ‍ॅड़ बी. ए. अलुर म्हणाले की, केवळ हेतू वा उद्देश सिद्ध झाला म्हणून आरोपींना शिक्षा देता येत नाही़ हेतू सिद्ध करण्याची जबाबदारी भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे ही सरकार पक्षाची आहे़ आरोपींनी इंद्रायणी नदीच्या टोलनाक्यावरून जाताना नयना पुजारी त्यांच्या मोटारीत होती़ अथवा तिची पर्स वाहत्या पाण्यात सोडून दिली, हे सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाने टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेज किंवा टोलची रिसिट किंवा टोलनाक्यावरील कोणत्याही व्यक्तीचा जबाब पुरावा म्हणून न्यायालयात तपासला नाही़ तसेच नयनाच्या एटीएम कार्डवरून कोणी रक्कम काढली,किती वाजता काढली हे सिद्ध करण्यासाठी एटीएम व सीसीटीव्ही फुटेज असतानाही न्यायालयात दाखल केले नाही़
(प्रतिनिधी)

Web Title: The purpose behind the murder is not proved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.