पुरंदर तालुका तापला, ४०.६ अंश सेल्सिअस

By Admin | Updated: June 9, 2014 04:53 IST2014-06-09T04:53:36+5:302014-06-09T04:53:36+5:30

महाराष्ट्राच्या नागपूर, वर्धा, अमरावती अकोलासह काही जिल्ह्यात दि. ७ जून रोजी कमाल तापमान वाढले असताना पुरंदरच्या भागात ही कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले

Purandar taluka thermal, 40.6 degrees Celsius | पुरंदर तालुका तापला, ४०.६ अंश सेल्सिअस

पुरंदर तालुका तापला, ४०.६ अंश सेल्सिअस

सासवड : महाराष्ट्राच्या नागपूर, वर्धा, अमरावती अकोलासह काही जिल्ह्यात दि. ७ जून रोजी कमाल तापमान वाढले असताना पुरंदरच्या भागात ही कमाल तापमान ४०.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आज दि. ८ रोजी कमाल तापमान ३९.८ अंश तर किमान २३.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. आज दिवस भर आकाश निरभ्र व स्तब्ध वारा असल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता. जून महिन्यात सरासरी कमाल तापमान २५ ते २९ तर किमान १५ ते १८ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदले जाते. परंतु मार्च ते मे पर्यत आवकाळी पाऊस झाला असल्याने वातावरणात ही बदल झाल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी ७ जूनला महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस दाखल होत असतो. यावर्षी प्रथमच या महिन्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. अशी माहिती आचार्य अत्रे वेधशाळचे व्यवस्थापक नितिन यादव यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Purandar taluka thermal, 40.6 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.