जलयुक्तच्या ‘वॉटर कप’साठी पुरंदर, इंदापूरचा समावेश

By Admin | Updated: January 9, 2017 02:30 IST2017-01-09T02:30:37+5:302017-01-09T02:30:37+5:30

सिनेअभिनेते आमिर खान हे स्वत: शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत सहभागी झालेले असून, त्यांनी पाणी फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे.

Purandar, Indapur, for water tank's water cup | जलयुक्तच्या ‘वॉटर कप’साठी पुरंदर, इंदापूरचा समावेश

जलयुक्तच्या ‘वॉटर कप’साठी पुरंदर, इंदापूरचा समावेश

जेजुरी : सिनेअभिनेते आमिर खान हे स्वत: शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत सहभागी झालेले असून, त्यांनी पाणी फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणी जतन व संवर्धनाचे मोठे काम उभे करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी लोकसहभागासह पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी केले आहे.
पुरंदर पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात या फाउंडेशनच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पाणी फाउंडेशनचे पुरंदर तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी फाउंडेशनच्या कामाची तसेच फाउंडेशनकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धेची विस्तृत माहिती दिली. फाउंडेशनच्या वतीने या वर्षी राज्यातून १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून पुरंदर आणि इंदापूर तालुक्याची निवड केली आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून, शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे.
पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी ही ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी आपापल्या ग्रामपंचायत स्तरावर या उपक्रम व स्पर्धेविषयी ग्रामस्थांना माहिती द्यावी व ग्रामपंचायतींचा सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Purandar, Indapur, for water tank's water cup