शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचे काम तीन वर्षांत मार्गी लावू : सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:39 IST

जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. 

ठळक मुद्देपुरंदरमध्येच होणार विमानतळ; बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने करणार  भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले पॅकेज देण्याचा आमचा प्रयत्न

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या व जिल्हा आणि शहराच्या विकासाचा मानबिंदू ठरणारे पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार असल्याचे स्पष्ट करत येत्या तीन वर्षांत हे काम मार्गी लागेल, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी येथे व्यक्त केले. विमानतळाला नागरिकांचा विरोध नसून, शासनाच्या वतीने जास्तीत जास्त चांगल्या पुनर्वसनाची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासन म्हणून नागरिकांचे कवडीचे नुकसान न करता सर्वांत चांगले पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात सौरभ राव यांनी ही माहिती दिली. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे २७०० ते  २८०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासाठीचे भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले पॅकेज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय बाधित कुटुंबातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. पुरंदर विमानतळाचे भूसंपादन आणि प्रत्यक्ष विमानतळ सुरू होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. तोपर्यंत या गावांमधील युवक-युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा करण्यात येत आहे. याठिकाणी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. त्याठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हा पुनर्वसन धोरणाचा एक भाग असल्याचे राव यांनी सांगितले. संरक्षणाची जबाबदारी हवाई दलाकडे लोहगाव विमानतळावरून रोज ११० प्रवासी विमाने ये-जा करतात. तर संरक्षण विभागाची फक्त ८ विमानांची ये-जा होते. लोहगाव विमानतळावरून ९२ टक्के नागरी उड्डाणे आहेत. तर संरक्षण विभागातील आठ टक्के विमानांचे उड्डाण होते. लोहगाव विमानतळ संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मुंबईवरील संरक्षणाची जबाबदारी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाकडे आहे. 

टॅग्स :PurandarपुरंदरPuneपुणेAirportविमानतळSaurabh Raoसौरभ राव