शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या आईचा लिलाव कसा करणार? पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:17 IST

आम्ही शेतकरी भाबडे आहोत. आमच्या भावना समजून घ्या. आमच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची तयारी सुरू केली आहे. मात्र, आम्हाला या प्रकल्पासाठी जमीन द्यायचीच नाही. आमच्या काळ्या आईचा लिलाव कसा करणार, असा सवाल करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आपला विरोध कायम ठेवला. त्याच वेळी शनिवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांसह त्यांच्या मुलावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बाधित शेतकऱ्यांची सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी बोलत होते. सात गावांच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आणि उदाचीवाडीचे बाधित शेतकरी संतोष हगवणे, एखतपूरचे उपसरपंच, तुषार झुरंगे, वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर आदींनी भूमिका मांडली.‘आमची जमीन द्यायची नाही. काळ्या आईचा लिलाव कसा करायचा? तुम्ही जबरदस्तीने ती घेण्याचा प्रयत्न का करत आहात, असा सवाल हगवणे यांनी उपस्थित केला. ‘आम्ही आंदोलनात सहभागी होतो. गावातील महिलांच्या अंगावर काही कर्मचारी चालून आले. आम्ही शेतकरी भाबडे आहोत. आमच्या भावना समजून घ्या. आमच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तो चुकीचा आहे. आम्ही दगडफेक केलीच नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.‘या प्रकल्पाला विरोध आहे. आमच्या जमिनी घेण्याबाबत कोणतीही चर्चा करण्यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले, त्यावर चर्चा करा. गुन्हे दाखल कशासाठी केले जात आहेत. त्यांच्यावर गुन्हे मागे घेण्यात यावे,’ अशी मागणी एखतपूरचे उपसरपंच तुषार झुरंगे यांनी केली. महसूलमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मोबदल्यासंदर्भातील पर्याय देण्याबाबत सर्व सात गावांमधील शेतकऱ्यांची चर्चा करू, असेही झुरंगे यांनी यावेळी स्पष्ट केले.आम्हाला विमानतळासाठी जागा द्यायची नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. तसेच सात गाव हे आता एक परिवार झाले आहेत. परिवाराचा एक व्यक्ती म्हणून आम्ही परिवारात चर्चा करू शकतो. त्यामुळे सरकारला जमीन द्यायची नाही, असे सांगितले असले तरी सरकारने आमच्याकडे दुसरा पर्याय मागितला आहे. त्याबाबत चर्चा करावी लागेल, असे स्पष्ट मत संतोष हगवणे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड