पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अश्वारूढ तैलचित्राचे थाटात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:33+5:302021-01-13T04:25:33+5:30
पुणे : वाफगाव येथे बुधवारी (दि. ६)महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या राज्याभिषेक सोहळ्यात ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अश्वारूढ तैलचित्राचे थाटात प्रकाशन
पुणे : वाफगाव येथे बुधवारी (दि. ६)महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या राज्याभिषेक सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अश्वारूढ तैलचित्राचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे अश्वारूढ चित्र असावे, अशी भावना समाजातील अनेकांची होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अमेड, रामपुरा, सुलतानपूर, मांडवगण आदी युद्धांत स्वतः सहभागी होऊन युध्द संचालन केलेले आहे. २८ वर्षे राज्यकारभार करीत असतांना अमेडचा किल्ला घेण्यासाठी त्या स्वतः मैदानात उतरल्या होत्या. तर रामपुरा येथील चंद्रावताचे बंड अहिल्यादेवीनी युद्ध जिंकून केले होते, तर राघोबादादा महेश्वरवर चालून येत असल्याचे माहिती होताच अहिल्यादेवींनी स्त्रियांची फलटण उभी करुन दोन हात करण्याची तयारी दाखवली होती. त्यांच्या या व्यक्तिरेखा तैलचित्रातून साकारण्यासाठी मोहोळच्या आसिफ शिकलगार यांनी होळकर रियासतीचे अभ्यासक रामभाऊ लांडे व बापूसाहेब हाटकर यांच्या संदर्भाने अहिल्यादेवीचे अश्वारूढ तैलचित्र साकारले.
तैलचित्राचे आमदार गोपीचंद पडळकर, सुरेश कांबळे, भूषणसिंह होळकर, प्रा. यशपाल भिंगे, अर्जुन सलगर, नवनाथ पडळकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. तैलचित्र प्रकाशित झाल्यानंतर आमदार पडळकर म्हणाले की, अहिल्यादेवींचे नवीन तैलचित्र ऐतिहासिक असे असु न इतिहासात याच चित्राची नोंद होईल अशी भावना व्यक्त केली.
खंडुतात्या तांबडे, श्रीधर गोरे, संतोष वाघमोडे, रामभाऊ लांडे, जिजाभाऊ मिसाळ यांनी अथक परिश्रम घेत श्री खंडेराय फांउडेशनच्या माध्यमातून तैलचित्र तयार केले आहे. यासाठी समाजातील दानशूर लोकांनी आर्थिक सहकार्य केले. भगवान जऱ्हाड, नवनाथ बुळे, रोहित पांढरे, अक्षय बर्वे, आनंद कोकरे, नितीन शेंडगे, गणेश शिंदे यांनीही परिश्रम घेतले.
१० पुणे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ तैलचित्राचे वाफगाव येथे राजे भूषणसिंह होळकर यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.