शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर दरमहा घेतात १ कोटी लिटर मद्याचा घोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 08:00 IST

गेल्या दोन महिन्यामध्ये जिल्ह्यात २ कोटी ८ लाख लिटर मद्य विक्री जिल्ह्यात झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात मागणीत वाढ : बीअर, विदेशी-देशी मद्याला अधिक पसंती २ लाख ५४ हजार ३०३ लिटर वाईनचा स्वादही पुणेकरांनी चाखल्याचे समोर

पुणे : गेल्या तीन वर्षांत मद्यप्राशनाचे प्रमाण वाढले असून, दरमहा तब्बल १ कोटी लिटर मद्य पुणेकर रिचवित आहेत. गेल्या दोन महिन्यामध्ये जिल्ह्यात २ कोटी ८ लाख लिटर मद्य विक्री जिल्ह्यात झाली आहे. विदेशी मद्य, बीअर, देशी दारु आणि वाईन या चारही प्रकाराच्या मद्यविक्रीत वाढ झाली असून, बीअर आणि विदेशी मद्याचा वाटा यात सर्वाधिक आहे. मद्य विक्रीच्या टक्केवारीमध्ये अपवाद वगळता सातत्याने मोठी वाढ दिसून येत आहे. तुम्हाला, पावसाळा आणि हिवाळ्यात मद्य प्राशनाचे प्रमाण वाढत असल्याचे वाटत असल्यास ती चूक ठरेल. पावसाळ्यात ऑगस्ट महिना,  हिवाळ्यात डिसेंबर, जानेवारी आणि उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात तुलनेने मद्य विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही उन्हाळ्यामध्ये बीअर विक्रीमध्ये पंधरा ते १७ टक्के आणि विदेशी मद्य विक्रीत २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. या शिवाय मद्याचा वार्षिक खपही सरासरी दहा ते वीस टक्क्यांनी वाढला आहे. प्रवृत्तीने उष्ण असूनही, थंड बीअर बरोबरच देशी-विदेशी मद्य उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रिचविले जात आहे. एप्रिल आणि मे महिन्यात २०१७-१८च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये देशी मद्याची विक्री तब्बल ३२ ते ४७ टक्क्यांनी वाढली. यंदाही मार्च महिन्यात साडेदहा टक्के आणि एप्रिल महिन्यात २.६ टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली आहे. मार्च २०१८ आणि एप्रिल २०१९ या दोन महिन्यांचा विचार केल्यास देशी मद्याची विक्री ४७ लाख ८१ हजार ८७५ लिटर झाली आहे. तर, याच कालावधीत विदेशी मद्य ५४ लाख ७५ हजार ४३९ आणि बीअरच्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ७९० लिटरचा घोट पुणेकरांनी अवघ्या दोन महिन्यांत घेतला आहे. तसेच, २ लाख ५४ हजार ३०३ लिटर वाईनचा स्वादही पुणेकरांनी चाखल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.  -------------------------

मद्यविक्री लिटरमध्ये 

साल            देशी        विदेशी        बीअर        वाईन२०१७-१८        २,३५,६८,९७३    २,९७,६०,९६८    ४,४७,४१,७९९    १,२०,२,६३१२०१८-१९        २,८३,८१,४२९    ३,३७,६८,१६७    ४,९९,७४,३६६    १४,७९,३९४२०१९-२० (एप्रिल)    २२,४५,९११    २५,८९,८७४    ५१,९९,९५९    १,००,१३२-----------------------

बिअर स्ट्रॉंगच हवीपुणेकरांनी २०१८-१९मध्ये ४ कोटी ९९ लाख ७४ हजार ३६६ लिटर बीअर रिचविली आहे. यात स्ट्रॉंग बीअरचा वाटा ३ कोटी ६७ लाख, ७३ हजार ४५५ लिटर असून, माईल्ड बीअरचे प्रमाण १ कोटी ३२ लाख ९११ लिटर इतके आहे. आत्ताच्या एप्रिल महिन्यातही ५१ लाख ९९ हजार ९५९ लिटर बीअर फस्त केली असून, त्यात स्ट्रॉंग बीअरचा वाटा ३४ लाख ४७ हजार ३२९ लिटर इतका आहे.      

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीFDAएफडीए