शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पुणेकर म्हणतात, कामात नाविन्य ते काय?; केवळ गाजावाजा जास्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 01:04 IST

महापालिका करत असलेली कामे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी करत असल्याने त्यात नाविन्य ते काय?, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

- राजू इनामदारपुणे : महापालिका करत असलेली कामे पुणेस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी करत असल्याने त्यात नाविन्य ते काय?, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.विशेष क्षेत्र म्हणून औंध-बाणेर-बालेवाडी परिसराची निवड करण्यात आली. ती पुणेकरांनी केल्याचे दाखवण्यात आले, मात्र त्यासाठी अर्ज भरून घेणे वगैरे प्रक्रिया संशयास्पद होती. काही लाख लोकांनी हे विशेष क्षेत्र निवडले, यावर आजही पुणेकरांचा विश्वास नाही.दोन वर्षात कंपनीने एकूण ५८ प्रकल्प जाहीर केले. त्यापैकी एकही प्रकल्प महापालिका करू शकणार नाही, असा नाही. सायकल शेअरिंगपासून ते रस्त्यावर वायफाय सेंटर्स तयार करण्यापर्यंत सगळी कामे महापालिका करतेच आहे. स्मार्ट सिटीचे काम कमी व त्याची ब्रँण्डिंगच जास्त असा प्रकार सुरू आहे.५८ योजनांपैकी डिस्प्ले बोर्ड, वायफाय सेंटर्स, कौशल्य विकास केंद्र, ग्रीन पार्क, सायकल शेअरिंग, मॉडेल रोड अशा काही मोजक्याच योजना वगळता दृश्य स्वरुपातील व नाव घ्यावे, अशी एकही योजना स्मार्ट सिटी कंपनीकडून झालेली नाही. अ‍ॅडाप्टिव्ह म्हणजे सेन्सर बसवलेल्या सिग्नल्सचे स्वप्न दाखवण्यात आले. ई- बस सुरू करणार सांगण्यात आले, पण निविदांच्या स्तरावरच हे सर्व कोसळले.संचालक मंडळात लोकप्रतिनिधींचे वर्चस्व नको म्हणून त्यांची संख्या ७ व सरकारी अधिकाऱ्यांची ८ करण्यात आली, पण भाजपाच्याच पालिकेतील संचालकांपैकी काहींनी त्रुटी दाखवल्यामुळे काही योजना तिथेच थांबून राहिल्या आहेत. फक्त ११ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. १९ सुरू आहेत. ९ निविदा प्रक्रियेत आहेत. १३ प्रकल्पांचा डीपीआर तयार झाला आहे व ६ अगदीच प्राथमिक चर्चेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSmart Cityस्मार्ट सिटी