शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर जेरीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 02:40 IST

तब्बल दीड लाखाची संख्या : स्मार्ट सिटीचे नागरिक वैतागले

पुणे : पुणे शहर हे देशात राहण्यासाठी सर्वाेत्तम शहर असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. परंतु याच पुण्यात भटक्या कुत्र्यांनी मात्र पुणेकरांना जेरीस आणले आहे. जवळपास दीड लाखाहून अधिक भटकी कुत्री शहरात असून त्यांच्या उच्छादाने पुणेकर पुरते वैतागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरच्या टॉमी, टायगरपासून कधी सुटका मिळणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली आहे. रात्री उशिरा घरी जाणाऱ्या दुचाकीचालकांच्या मागे ही कुत्री लागत असल्याने अनेक अपघातही झाले आहेत. त्यातच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जुलै २०१८ या कालावधीत एकूण ६ हजार नऊशे ३९ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून ११ नागरिकांना रेबीजची लागण झाल्याचे समोर आले आहे. भटकी कुत्री शहरातील सर्वच भागामध्ये गटागटाने नागरिकांवर हल्ले करीत असल्याने महिलांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ठिकठिकाणी साचलेल्या कचºयाच्या जवळ ही कुत्री भटकत असतात. एखाद्याच्या हातात एखादी पिशवी असेल किंवा काही सामान असेल, तर कुत्री त्यांच्यावर हल्ला करतात. त्याचबरोबर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाºया नागरिकांनाही या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जॉगिंग करताना अनेकांच्या मागे ही कुत्री लागत असल्याने नागरिकांना व्यायाम करणेही कठीण झाले आहे. तसेच ही कुत्री रस्त्यावर कुठेही घाण करीत असल्यामुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.त्यातच काही नागरिकांची पाळीव कुत्री ही रस्त्यावरच घाण करत असल्याने रस्ते अधिकच अस्वच्छ होत आहेत. शहरातील बहुतांश भागातील चित्र सारखेच आहे. या कुत्र्यांपासून सुटका मिळविण्यासाठी नागरिक विविध उपाय करीत आहेत. काहींनी आपल्या घराच्या दारात एका बाटलीमध्ये लाल रंगाचे पाणीसुद्धा ठेवून पाहिले. काही महिन्यांपूर्वी बाणेरमध्ये काही कुत्रीही मृतावस्थेत आढळली होती, अशीच घटना हडपसरमध्येसुद्धा घडली होती. या घटनांचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत. प्रशासन या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात कमी पडत असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.दिवसाला ६० कुत्र्यांची नसबंदी : गळ्यात बसवणार ट्रॅकिंग कॉलर; स्वयंसेवी संस्थांची मदत घेणारकुत्र्यांच्या नसबंदीसंदर्भात बोलताना महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश वाघ म्हणाले, की सध्या शहरातील दोन ठिकाणी या भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. दिवसाला साधारण ५० ते ६० भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते.४काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नसबंदी केंद्रे वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच सेंट्रलिंग डॉग कॅचिंग अ‍ॅण्ड रिलिज सिस्टीमउपक्रम आम्ही हाती घेत आहोत. ज्या अंतर्गत कुत्र्यांना लसीकरणकरणाºया संस्थेने एक अ‍ॅप डेव्हलप करावे लागणार आहे.ज्यात नसबंदी केलेल्या कुत्र्यांची तसेच न केलेल्या कुत्र्यांची माहितीमिळू शकणार आहे.४तसेच लसीकरण केलेल्या कुत्र्यांच्या गळ्यात एक कॉलर लावण्यात येणार असून त्यात चीप बसविण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून त्या कुत्र्यांच्या लसीकरणाबद्दलची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सध्या मनुष्यबळाचा अभाव असला तरी येत्या काळात जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. येत्या काळात अधिक काही लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा