शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र पवार यांना पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 16:26 IST

गेल्या दोन वर्षात कृषीक्षेत्रातील विविध पुरस्कराने सन्मानित

ठळक मुद्देअ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाची घातली भर

बारामती: बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना २०१९ चा राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहिर झाला आहे. तसेच बारामती तालुक्यातील कांबळेश्वरच्या आशा शिवाजी खलाटे यांना देखील जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे. बारामतीला कृषिक्षेत्रातील राज्यस्तरीय  दोन पुरस्कार मिळाल्याने दुहेरी आनंद झाला आहे. 

दोन वषार्तील पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, डॉक्टर पद्मश्री विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना जाहीर झाले आहेत. 

राजेंद्र पवार यांनी कृषिक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. बारामतीतील पवार घराणे फक्त राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र राजेंद्र पवार यांनी जाणिवपूर्वक स्वत:ला राजकाराणापासून दूर ठेवत. कृषिक्षेत्रामध्ये झोकून देऊन काम केले आहे. बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाची भर घालत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची गोडी लावली. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा देखील प्रयत्न सातत्याने केला जात आहे. कृषि विज्ञान केंद्र बारामती, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थाच्या माध्यामातू राजेंद्र पवार देशभरातील शेतकऱ्यांशी जोडले गेले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत राज्य शासानाच्या वतीने २०१९ चा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीMLAआमदारFarmerशेतकरी