शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई; दोन दिवसांत तब्बल ८८ हजारांचा दंड केला वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 20:38 IST

खडकवासला धरण चौपाटीवर कडक नाकाबंदी, हवेली पोलीसांच्या वतीने १७७ जणांवर दंडात्मक कारवाई

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलिसांकडून शनिवार व रविवार असे आठवड्यातील दोन दिवस कडक नाकाबंदी करण्यात येत आहे

धायरी: मागील रविवारी झालेली पर्यटकांची गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत तब्बल ८८ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करीत हवेली पोलीसांच्या वतीने १७७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पावसाळ्यात शनिवार-रविवारसह इतर दिवशी पर्यटकांची पावलं धरणांकडे वळतात. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यटन स्थळांवर कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन हवेली पोलिसांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत असले तरीही पर्यटक येत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.  पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी हवेली पोलिसांकडून शनिवार व रविवार असे आठवड्यातील दोन दिवस कडक नाकाबंदी करण्यात येत आहे.

सिंहगडच्या आसपास अनके ठिकाणी कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी

सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा, गोळेवाडी चेक पोस्ट, नांदेड फाटा, खडकवासला धरण चौक,  खेड शिवापूरकडून येणाऱ्या कोंढणपूर फाटा अशा ठिकाणी कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात येत आहे. त्याचबरोबर वाहनांची तपासणी करून  प्रत्येक पर्यटकाला पाचशे रुपये दंड तर करण्यात येत आहेच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ नुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटक