मास्क न वापरणाऱ्यांवर बिबवेवाडीत दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:47+5:302021-02-23T04:16:47+5:30

शहरात कोरोनाबधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बिबवेवाडी परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर, सामाजिक अंतर न पाळणारे, तसेच ...

Punitive action against those who do not use masks in Bibwewadi | मास्क न वापरणाऱ्यांवर बिबवेवाडीत दंडात्मक कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर बिबवेवाडीत दंडात्मक कारवाई

शहरात कोरोनाबधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बिबवेवाडी परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर, सामाजिक अंतर न पाळणारे, तसेच रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वछता करणे आदी नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये मास्क न वापरणाऱ्या एकूण २६ जणांवर, रस्त्यावर थुंकणाऱ्या एका व्यक्तीवर, तर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ११ जणांवर कारवाई केली, तसेच सामाजिक अंतर न राखणाऱ्या एकूण २५ जणांवर दंडात्मक कारवाई करून अशा एकूण ६३ जणांकडून एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विक्रम काथवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राहुल बाठे, सुजय ठकार, श्रीधर कांबळे, शब्बीर शेख, सचिन पवार यांनी सदर कारवाई केली

................................................................................

फोटो ओळ:- बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत दंडात्मक कारवाई करताना महापालिका कर्मचारी.

Web Title: Punitive action against those who do not use masks in Bibwewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.