पुण्याला ‘स्वाइन’चा विळखा

By Admin | Updated: August 22, 2015 02:20 IST2015-08-22T02:20:43+5:302015-08-22T02:20:43+5:30

तीन महिन्यांपासून गायब झालेल्या स्वाइन फ्लूने शहरात पुन्हा डोके वर काढले असून, हा विळखा वेगाने घट्ट होऊ लागला आहे. या महिन्याच्या अवघ्या

Punine 'Swine' breaks | पुण्याला ‘स्वाइन’चा विळखा

पुण्याला ‘स्वाइन’चा विळखा

पुणे : तीन महिन्यांपासून गायब झालेल्या स्वाइन फ्लूने शहरात पुन्हा डोके वर काढले असून, हा विळखा वेगाने घट्ट होऊ लागला आहे. या महिन्याच्या अवघ्या २० दिवसांत स्वाइन फ्लूची लागण झालेले तब्बल ४० रुग्ण सापडले असून, त्यांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराला उशीर होत असल्याने रुग्णांची प्रकृती चिंताजनक होण्याचे प्रमाण पुण्यात राज्यामध्ये सर्वाधिक आहे. सध्या पुण्यात १३ रुग्ण कृत्रिम श्वासोच्छ्वासावर आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला अचाकन पुण्यात डोके वर काढलेल्या स्वाइन फ्लूने काही दिवसांत पूर्ण शहराला विळख्यात घेतले. जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत स्वाइन फ्लू पुण्यात थैमान माजविण्यास सुरुवात केली. हा काळ थंडीचा असल्याने स्वाइन फ्लूच्या ‘एच १ एन १’ या विषाणूंसाठी पोषक वातावरण होते. मात्र, मे महिन्यात वेगाने वाढलेल्या तापमानामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना अनुकूल स्थिती राहिली नाही. त्यामुळे हा आजार वेगाने कमी झाला होता. मात्र, आता पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने पुण्यात पुन्हा स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर हे विषाणू हल्ला करीत आहेत. त्यामुळे स्वाइन फ्लूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.
या महिन्यात दि. १ ते २० आॅगस्ट तब्बल ४० जणांना या आजाराची लागण झाली व त्यांपैकी ७ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.

Web Title: Punine 'Swine' breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.