पुण्याच्या पाण्याचा झाला खेळखंडोबा
By Admin | Updated: September 6, 2014 00:00 IST2014-09-06T00:00:17+5:302014-09-06T00:00:17+5:30
शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे.

पुण्याच्या पाण्याचा झाला खेळखंडोबा
पुणो : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात 1क्क् टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थांनी दोनवेळा पाणी पुरवठय़ाची मागणी केली आहे. परंतु, पुढील वर्षभर शहराला सुरळित पाणी पुरवठा होण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठय़ावर महापालिका प्रशासन ठाम आहे. गेल्या तीन महिन्यांत एक दिवसा आड, दोनवेळा आणि एकवेळा असे वारंवार पाणी पुरवठय़ाचे निर्णय़ बदलण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठा नियोजन व यंत्रणोचा खेळखंडोबा होणार आहे.
खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर या धरणात 1क्क् टक्के साठा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातूनही कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. मग, पुणोकरांना एकवेळ पाणी पुरवठा का ? असा सवाल शहरातील राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्थानी उपस्थित केला आहे. धरणो भरल्यामुळे दोन वेळ पाणी देण्याची मागणी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. मात्र, वारंवार पाणी पुरवठय़ाच्या नियोजनात बदल करणो अशक्य आहे.
दरवर्षी धरणो 1क्क् टक्के भरूनही मार्च महिन्यांत पाणी कपात करावी लागते. त्यामुळे महापालिकेने यंदापासून 31 जुलैऐवजी ऑगस्ट अखेर्पयत राखीव साठा ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात होणारी पाणी टंचाई व कपात टाळता येईल. त्यादृष्टीने वर्षेभर एकवेळ व पुरेसा पाणी पुरवठा सुरू ठेवण्यावर प्रशासन ठाम आहे.(प्रतिनिधी)
पुरवठय़ाचा लंपडाव
प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या धरसोड वृत्तीमुळे एकवेळ आणि दोनवेळ पाणी पुरवठा केला जात असल्याने वितरण व्यवस्था वारंवार विस्कळीत होत आहे. धरणातील पाणीसाठयाने तळ गाठल्याने जून महिन्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पाऊस आणखीनच लांबल्याने जुलैच्या दुस-या आठवडयात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. पुन्हा 25 जुलै रोजी एकवेळ पाणी सुरू करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात दोन वेळा पाणी सुरू करण्यात आले. तर पुन्हा 14 ऑगस्टला एक वेळ पाण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार वितरण व्यवस्थेत बदल केल्याने पाणी पुरवठा यंत्रणोचा बिघाड होत असून, त्याचा त्रस सर्वसामान्यांना पुणोकरांना सहन करावा लागत आहे.
पुणोकरांचे पाणी आंध्राला कशाला
शहराला पाणी पुरवठा करणारी धरणो 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे यापुढे या धरणांमध्ये पडणारा प्रत्येक थेंब नदीत व कालव्यात सोडून ध्यावा लागणार आहे. पुढचे उजनी धरण ही 1क्क् } भरले आहे त्यामुळे नदीत सोडलेले पाणी उजनी मध्ये ही साठवता येणार नाही व ते तेथून आंध्र मध्ये सोडावे लागणार आहे. म्हणजे पानशेत, खडकवासला धरणांचे पाणी थेट आंध्रप्रदेशला जाणार आहे. दुसरीकडे कालव्यातून पुणो जिल्हसाठी पाणी सोडणो सुरूच आहे, आणि पावसाळा संपेपयर्ंत ते सुरूच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हे जादा पाणी पुणोकरांना देऊन एकवेळ पाण्याची कपात मागे घ्यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. तसेच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने हा निर्णय तत्काळ घ्यावा अशी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.
राजकीय पक्ष तसेच स्वयंसेवी संस्थाच्या मागणीनुसार आयुक्तांनी बैठक बोलाविली होती. त्यात एकवेळ पाणी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
- व्ही.जी कुलकर्णी,
पाणीपुरवठा विभाग प्रमुख