पुण्याचा टेस्ट पॉॅझिटिव्हीटी रेट तुलनेने झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:55+5:302021-04-16T04:11:55+5:30

पुणे शहरात कोरोना रुग्णवाढ सातत्याने सुरु होती. शहरात एकाच दिवशी जवळपास ७००० रुग्ण सापडण्यापर्यंत हे प्रमाण गेले होते. पण ...

Pune's test positivity rate was relatively low | पुण्याचा टेस्ट पॉॅझिटिव्हीटी रेट तुलनेने झाला कमी

पुण्याचा टेस्ट पॉॅझिटिव्हीटी रेट तुलनेने झाला कमी

Next

पुणे शहरात कोरोना रुग्णवाढ सातत्याने सुरु होती. शहरात एकाच दिवशी जवळपास ७००० रुग्ण सापडण्यापर्यंत हे प्रमाण गेले होते. पण आता मात्र गेल्या काही दिवसात यामध्ये दिलासा मिळालेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेशो हा २५% ते २१ % पर्यंत आलेला पहायला मिळत आहे. ३० टक्क्यांच्या वर गेलेले हे प्रमाण कमी होणे ही नक्कीच दिलासादायक बाब ठरत आहे.

आज देखील शहरात 21922 चाचण्या झाल्या तर यामध्ये 5395 रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले. यानुसार टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट हा २४.६% आहे. ३३% वर गेलेला हा रेट २४% वर येणं हा शहरासाठी दिलासा मानला जात आहे.

अर्थात टेस्टींग देखील काही प्रमाणात कमी झाले आहे. महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॅा. संजीव वावरे म्हणाले “ गेल्या ४-५ दिवसांत हा रेशो कमी होवुन त्याचा प्लॅटु झालेला दिसतो आहे. म्हणजे हे प्रमाण स्थिर झाले आहे. साधारण १० ते १५ दिवस हे प्रमाण असेच राहीले तर तो दिलासा ठरेल”

Web Title: Pune's test positivity rate was relatively low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.