शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील एसटी, रेल्वे वाहतूक दिवसभर विस्कळीत, मुंबईतील पावसाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 01:50 IST

मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे एसटी व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतुक विस्कळीत झाली असून एसटीच्या प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसत आहे. मंगळवारीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

पुणे : मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे एसटी व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतुक विस्कळीत झाली असून एसटीच्या प्रवाशांना त्याचा अधिक फटका बसत आहे. मंगळवारीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.पावसामुळे मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. पुणे व मुंबई दरम्यान एसटीच्या दररोज शेकडो फेऱ्या होतात. पण मुंबईतील रस्ते तुंबल्याने दोन्ही बाजुने एसटीच्या अनेक फेºया रद्द कराव्या लागल्या आहेत. तर बहुतेक गाड्या तब्बल तीन ते चार तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. सोमवारी सकाळपासूनच दोन्ही बाजुच्या बस विलंबाने धावत होत्या. पावसाचा जोर वाढून पाणी साठण्याचे प्रमाण वाढल्याने प्रत्येक बस उशिरा धावत होती.दुपारनंतर वाहतुकीवर आणखी परिणाम झाल्याने काही फेºया रद्द कराव्या लागल्या. तसेच पावसामुळे प्रवाशांनाही पाठ फिरविली. परिणामी एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात आल्याचे अधिकाºयांनी सांगितले.मुंबईसाठी प्रामुख्याने स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकातून बस सोडल्या जातात. शिवाजीनगर स्थानकातून दररोज १०० फेºया होतात. त्यापैकी सुमारे ३० फेºया रद्द कराव्या लागल्या. सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत होत्या. स्वारगेटमधील बसेसचीही जवळपास हीच स्थिती होती. मंगळवारीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बस विलंबाने धावल्या तर काही फे-या रद्द करून आवश्यकतेनुसार बस सोडण्यात येतील, असेही एसटीतील अधिकाºयांनी सांगितले.मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी (दि. ९) पुण्यातून सुटणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. तसेच मंगळवारीही (दि. १०) मुंबईहून सुटणारी ही गाडी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पुणे-मुंबई वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला आहे.इंद्रायणी एक्सप्रेस वगळता या मार्गावर धावणारी एकही गाडी रद्द करण्यात आली नाही. मात्र, पावसामुळे बहुतेक गाड्या विलंबाने धावत होत्या. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. पुणे-भुसावळ एक्सप्रेस पनवेलऐवजी दौंड-मनमाड मार्गाने वळविण्यात आली. हवामान विभागाने मुंबईत आणखी दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवारीही रेल्वे वाहतुक काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस