शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील सार्वजनिक वाहुतक व्यवस्था कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 14:19 IST

शासनाने रस्ते आणि उड्डाणपूलांवर खर्च करण्यापेक्षा सक्षम सार्वजनिक वाहतुकीकरिता खर्च होणे गरजेचे आहे. 

ठळक मुद्दे पीएमपीची बससेवा सुधारण्यासाठी सुसज्ज बस आगार उभारणे आणि मार्गांचे सुसूत्रीकरणाची गरज

पुणे : देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अनेक पटीने मागे आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, इंदौर, बंगळुरू या शहरांमध्ये वाहतुक व्यवस्थेला शासनासह सर्वांकडूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. पीएमपीची बससेवा सुधारण्यासाठी प्राथमिक सोयी सुविधा चांगल्या करणे, सुसज्ज बस आगार उभारणे आणि मार्गांचे सुसूत्रीकरणाची गरज असल्याचे मत वाहतूक तज्ज्ञ प्रसन्न पटवर्धन यांनी व्यक्त केले. पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित ह्यविविध शहरातील प्रवासी केंद्रीत बससेवा व पीएमपीह्ण या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, सतिश चितळे, संजय शितोळे आदी यावेळी उपस्थित होते. सौजन्यशील सेवा दिल्याबद्दल तुषार सस्ते या पीएमपी वाहकाचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सजग व सक्रिय बस प्रवासी म्हणून वैभव कुलकर्णी, निळकंठ मांढरे, विपुल पाटील, रुपेश केसेकर, सु.वा.फडके, विराज देवधर, सतिश सुतार, जयदीप साठे यांना मोफत बस पास देण्यात आले.पटवर्धन म्हणाले, विविध पयार्यांच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. बीआरटी, मेट्रो यांसह विविध सेवांवर पैसे खर्च केले जातात. पण त्याआधी शहराचा भौगोलिक व प्रवासी संख्येच्या दृष्टीने अभ्यास केला जात नाही. शासनाने रस्ते आणि उड्डाणपूलांवर खर्च करण्यापेक्षा सक्षम सार्वजनिक वाहतुकीकरिता खर्च होणे गरजेचे आहे. पीएमपी सक्षम करण्यासाठी प्रवाशांनाच प्रशासन व राज्यकर्त्यांशी लढा द्यावा लागणार आहे. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांना कारभार समजेपर्यंत त्यांची बदली होते. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रवासी हिताचे निर्णय होत नाही, असे वेलणकर यांनी नमुद केले. बससेवा सक्षम करण्यासाठीचा लढा विविध माध्यमांतून कायम सुरू ठेवला जाईल, असा निर्धार राठी यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलSajag Nagrik Manchसजग नागरिक मंच