शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या निकिता टकलेने मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीचे पटकावले प्रथम पारितोषिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:29 IST

मलेशियामध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि चीन या देशातील सुमारे २२ स्पर्धक सहभागी झाले होते

हडपसर : मलेशियामध्ये मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता टकले-खडसरेने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले. तब्बल साडेतीनशेहून अधिक रॅलीमध्ये सहभाग नोंदविलेल्या मुसा शरीफ निकिताचा सहचालक होता. निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती ठरली. स्पर्धेच्या चार विभागांत निकिताने ट्रॉफी मिळवली आहे. एमआयआरसी रॅली ऑफ आशान, मलेशियामध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि चीन या देशातील सुमारे २२ स्पर्धक सहभागी झाले होते.

राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत अनेकवेळा भाग घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचणींना निकिताला सामोरे जावे लागले. त्यात भाषा, तंत्रज्ञान आणि नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागले. पहिल्याच स्टेजमध्ये एक किलोमीटरला तांत्रिक समस्या निर्माण झाली, कार दुरुस्त करून पुन्हा रॅलीत सहभागी होऊन पूर्ण केली. यामध्ये नऊ स्टेजमध्ये जास्त गुण मिळवून निकिताने सर्व समस्यांवर मात करत चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली. सुमारे ३६५ रॅली त्यातील ८६ आंतरराष्ट्रीय रॅलीत सहभाग असल्याने सहचालक मुसा शरीफ यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाल्याचे निकिता आवर्जून सांगते.

दोन दिवसीय रॅलीमध्ये पाऊस असल्याने खूप उष्ण वातावरण निर्माण झाले होते. उष्माघाताचा त्रास अनेकांना सहन करावा लागला. वातावरणही रॅलीसाठी उपयुक्त नव्हते. अशा परिस्थितीमध्ये नवखी आणि प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या निकिताने यश मिळविले. मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवघड रॅली मानली जाते. या रॅलीत सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात, त्यामुळे या रॅलीला अधिक महत्त्व आहे.

पामच्या झाडांमधून कार चालविताना फार सावध भूमिका घेत सहचालक मुसा शरीफ यांच्या सहकार्याने निकिता टकले खडसरेने चॅम्पियनशिप रॅलीत भारताचा झेंडा फडकविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणात चॅम्पियनशिप मिळविणारी निकिता पहिली स्पर्धक ठरली आहे. आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले संजय टकले, गौरव गिल, अरोर अर्जुन राव, कर्णाकदूर यांच्या रांगेत बसण्याचा मान निकिता टकले खडसरेने मिळविला आहे.

राष्ट्रीय स्तरावर अनेक रॅली जिंकल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री यांचा मोलाचा वाटा असल्याचे निकिता आवर्जून सांगते. आंतरराष्ट्रीय डब्ल्यूआरसी रॅली जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरWomenमहिलाMalaysiaमलेशियाcarकार